Best News Portal Development Company In India

प्रतिभा निकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे नव्याने प्रवेश घेतलेल्या 11वी वर्गातील विद्यार्थ्यांचे स्वागत…

प्रतिभा निकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे नव्याने प्रवेश घेतलेल्या 11वी वर्गातील विद्यार्थ्यांचे स्वागत….

उमरगा /लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव

नवागत विद्यार्थ्यांचे शाळेत किंवा महाविद्यालयात उत्साहात स्वागत करणे ही एक सुंदर परंपरा आहे. पहिल्या दिवशी त्यांचे गुलाबपुष्प, तिलक लावून स्वागत केले जाते आणि मोफत पाठ्यपुस्तके व शालेय साहित्याचे वाटप करून नवीन शैक्षणिक वर्षाची आनंददायी सुरुवात होते.

विज्ञान वाणिज्य आणि कला या सर्व शाखेतील महाविद्यालयात अभ्यासक्रमात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांचे महाविद्यालयीन वातावरणाशी नाते दृढ व्हावे, तसेच त्यांच्या शैक्षणिक व वैयक्तिक विकासाला योग्य दिशा मिळावी हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.

महाविद्यालयाचे प्राचार्य उल्हास घुरघुरे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करताना प्रतिभा निकेतन उच्च माध्यमिक विद्यालयाची व संस्थेची शैक्षणिक परंपरा,तसेच संशोधनाभिमुख दृष्टीकोन आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण घडणीत शिक्षकांची भूमिका याविषयी मार्गदर्शन केले. शिक्षणातील नव्या प्रवाहांची ओळख करून देत नेतृत्वगुण, संवादकौशल्य आणि उद्योग जगताशी जुळवून घेण्याची क्षमता विद्यार्थ्यांनी विकसित करावी, असे सांगितले.

आजोबांनी एक छोटसं रोपटं लावून त्याचं वटवृक्षात रूपांतर केला आहे त्यामुळे मुरूम शहर व परिसरातील आणि ग्रामीण भागातील मुला मुलींना शिक्षणाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली. यापुढील काळात ज्या काही आणखीन वेगवेगळे कोणते कोर्स आले तर विद्यार्थ्यांसाठी आपण नवनवीन उपक्रम व नवनवीन विषयाचे शिक्षण या ठिकाणी मुला-मुलींना देण्याचे कार्य करू व जेणेकरून ग्रामीण भागातील मुला मुलींना बाहेर गावी न जाता आपल्याच येथे शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करू असे शरण भैया पाटील यांनी आश्वासित केले .
आपला सोबती जर चांगला असेल तर चांगले गुण शिकाय मिळतील जर सोबती व सोबत चुकली तर आयुष्याला आपण चुकत आहोत किंवा चुकत गेलो हे आपणाला कळाले पाहिजे म्हणून सोबती योग्य निवडा व आपली प्रगती करावी.
असे राहुल पतंगे पीएसआय मुरूम पोलिस ठाणे यांनी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य उल्हास घुरघुरे, प्रमुख पाहुणे नगर शिक्षण विकास मंडळ संचालक तथा उमरगा जनता बँक चेअरमन शरण भैया पाटील , प्रमुख उपस्थिती राहुल पतंगे पीएसआय मुरूम, उपप्राचार्य उमाकांत महामुनी,मुख्याध्यापक आपचे पी.के. नगरसेवक सुजित शेळके,राजू मुल्ला,अमोल भोसगे, मुख्याध्यापक बनसगोळे सर
आदी मान्यवर उपस्थित होते.
11 वी प्रथम द्वितीय तृतीय येणाऱ्या मुलांचे मुलींची स्वागत करण्यात आले त्यात दासे सुभद्रा तुकाराम, शिरसाट सरस्वती भगवान, गाडेकर आरती लक्ष्मण,घुरघुरे अंजली अमृत, जाने बबीता मारुती, ब्याळीकुळे अदिती रामचंद्र, फुंडीपल्ले ऋतुजा भीमाशंकर, जमादार रेहान अल्ताफ, सय्यद अब्दुल करीम वजीर अली आदीचा सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रा.अण्णाराव कांबळे, प्रा.राजीव शाळू,प्रा.सतीश रामपुरे, प्रा.सुधीर नाकाडे, प्रा.नारायण सोलंनकर, प्रा.विश्वजीत अंबर, प्रा.राघवेंद्र धर्माधिकारी प्रा.अजित सूर्यवंशी, प्रा.बिभीषण बंडगर, प्रा.दयानंद राठोड,प्रा.अमोल गायकवाड, प्रा.रत्नदीप वाकडे, प्रा.सलीम जमादार,प्रा.अजित राठोड,प्रा.दीपक सांगळे,प्रा.सरस्वती तपसाळे,प्रा.माधुरी नरगिडे,प्रा.महेश संगशेट्टी, प्रा.साक्षी महामुनी,फिरोज कागदी,राजू कोळी,धनराज कांबळे, आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक प्रा.उमाकांत महामुनी सूत्रसंचालन प्रा.सतीश रामपुरे
आभार प्रा.बिभीषण बंडगर, यांनी मानले.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india