धाराशिवमध्ये ‘दादां’ना अनोखी आदरांजली: शासकीय कार्यालयांना भेट दिल्या अजितदादांच्या प्रतिमा!
तुळजापूर प्रतिनिधी:- कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तुळजापूर तालुका अध्यक्ष श्रीकृष्ण वसंतराव सूर्यवंशी यांचा उपक्रम; महाराष्ट्रात ठरला एकमेव आणि कौतुकास्पद उपक्रम!
दिवंगत लोकनेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या २२ जुलै रोजी येणाऱ्या जयंतीनिमित्त सर्व शासकीय आणि निमशासकीय जिल्हाधिकारी महाविद्यालय कार्यालयांमध्ये त्यांची जयंती साजरी करण्याचे परिपत्रक राज्य शासनाने जारी केले आहे. या पार्श्वभूमीवर, धाराशिव जिल्ह्यात आपल्या लाडक्या नेत्याची जयंती उत्साहात आणि योग्य आदराने साजरी व्हावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तुळजापूर तालुका अध्यक्ष यांच्या वतीने एक अत्यंत स्तुत्य आणि आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला आहे.
तुळजापूर तालुक्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयात तुळजापूर पोलीस ठाणे, तुळजापूर पंचायत समिती कार्यालय, तुळजापूर तहसील कार्यालय, तुळजापुरातील महाविद्यालये , शाळा , जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये अजितदादांची प्रतिमा सहजासहजी उपलब्ध व्हावी, यासाठी तुळजापूर तालुका अध्यक्ष श्री कृष्ण सूर्यवंशी यांच्या वतीने थेट शासकीय कार्यालयांना अजितदादांच्या सुबक प्रतिमा भेट म्हणून देण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्रात एकमेव उपक्रम; राज्यभरातून कौतुक
शासन परिपत्रकानुसार सर्व कार्यालयांत प्रतिमा पूजनाची तयारी पूर्ण व्हावी, यासाठी तुळजापूर तालुकाध्यक्ष स्वतः पुढाकार घेऊन हा अनोखा मार्ग निवडला. संपूर्ण महाराष्ट्रात अशा प्रकारचा उपक्रम राबवणारा धाराशिव हा एकमेव जिल्हा ठरला असून, या उपक्रमाचे राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय वर्तुळातून उस्फूर्त स्वागत व कौतुक होत आहे.
”अजितदादांचे विचार आणि त्यांनी प्रशासनाला दिलेली शिस्त कायम स्मरणात राहावी, यासाठी शासनाच्या निर्णयानुसार सर्व शासकीय कार्यालयांत त्यांची जयंती साजरी व्हावी, या हेतूने आम्ही हा प्रतिमा वाटपाचा उपक्रम राबवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तुळजापूर- धाराशिव जिल्ह्यात.
या उपक्रमामुळे २२ जुलै रोजी जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय आणि शैक्षणिक संस्थेत अजितदादांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करणे प्रशासनाला अधिक सोयीचे होणार आहे.









