दिल्ली येथील जंतर मंतर आंदोलनास रिपाइं (A) तुळजापूर तालुक्याच्या वतीने जाहीर पाठिंबा
————————————————
नळदुर्ग (एस.के. गायकवाड):
वैद्यकीय शिक्षण प्रवेश पूर्व ( Neet) या परीक्षेचा पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना तात्काळ निलंबित करण्याच्या मागणीसाठी दिल्ली येथील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनास तसेच आंदोलनाचे नेतृत्व करणारे श्री. अभिजीत दिपके व प्रख्यात वैज्ञानिक सोनम वांगचुक यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) तालुका शाखा तुळजापूरच्या वतीने चा जाहीर पाठिंबा देण्यात येत असून आंदोलकावर लाठी चार्ज करणाऱ्या पोलिसांचा जाहीर निषेध करण्यात येत आहे
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) चे राष्ट्रीय अध्यक्ष मा. दीपकभाऊ निकाळजे व राष्ट्रीय महासचिव माननीय मोहनलाल पाटील साहेब यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र प्रदेशअध्यक्ष बाळासाहेब पवार यांला मार्गदर्शनाखाली या संदर्भात तुळजापूर तालुक्याचे तहसीलदार व धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुका अध्यक्ष उमेश गायकवाड यांनी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की वैद्यकीय प्रवेश परीक्षा सह देशातील विविध स्पर्धा परीक्षा व भरती प्रक्रियांमधील कथित पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले असून, देशातील वीस विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलीआहे. या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी दिल्ली येथील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या अभिजीत दिपके सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) चा संपूर्ण जाहीर पाठिंबा देण्यात येत असून खालील मागण्या करण्यात येत आहेत.
1. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे.
2. परीक्षा पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष, पारदर्शक व वेळबद्ध चौकशी करण्यात यावी.
3. दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा.
4. शांततामय आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांच्या लोकशाही हक्कांचे संरक्षण करण्यात यावे.आदी मागण्य करून देशातील विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने या निवेदनाची तातडीने दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावी, असी विनंती करण्यात आली आहे.
तुळजापूर तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(A) चे तालुका अध्यक्ष उमेश गायकवाड यांच्यासह कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.





