दलित मित्र मोतीराम चव्हाण याचे सामाजीक व शैक्षणिक कार्य कौतुकास्पद : मा मधुकराव चव्हाण!
– – – – – – – – – – – – – – – –
जळकोट (अरुण लोखंडे ) दलित मित्र मोतीराम चव्हाण यांचे कार्य समाजासाठी कौतुकास्पद त्यांनी गोर गरीब व तळागाळातील लोकांसाठी समाजहिताचे कौतुकास्पद कार्य केले असे मत माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी व्यक्त केले.
तुळजापूर तालुक्यातील आलियाबाद येथे दलित मित्र मोतीराम चव्हाण यांच्या १८ व्या पुण्यस्मरण दिना निमित्त कार्यक्रमात ते बोलत होते. शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी गोरं गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे ज्ञानरूपी पवित्र कार्य केले असून अनेक तरुणाच्या हाताला काम मिळवून देवून अनेकांचे जीवनमान उचावले असे ते म्हणाले याप्रसंगी व्यासपीठावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अशोक पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गणेश सोनटक्के, माजी नायब तहसीलदार माणिकराव चव्हाण, माजी सभापती प्रकाश चव्हाण,प.स.सदस्य अशिष सोनटक्के ,जळकोटचे सरपंच गजेंद्र कदम,आलियाबाद सरपंच सुर्यकांत चव्हाण, रामतीर्थ सरपंच लक्ष्मण राठोड, महेश कदम,कृष्णात मोरे, तंटामुक्ती अध्यक्ष यशवंत पाटील, अरूण लोखंडे, अनिल छत्रे,उपसरपंच अमृता चव्हाण,बबन मोरे उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले..
कार्यक्रमास सेवानिवृत्त गटविकास अधिकारी टी.एन.चव्हाण, दिलीप सोमवंशी,शंकर चव्हाण,डी.डी.कदम, विजय मोरे, पंडित कदम, सुनील माने, संजय माने, संजय अंगुले, माजी चेअरमन राजु पाटील, बसवराज कवठे,नेमिनाथ चव्हाण, अमोल चव्हाण,सुभाष नाईक,वाय.के.चव्हाण,ग्रा.प.सदस्य सुर्यकांत राठोड,विनायक चव्हाण, शिवाजी पोलीस पाटील, माणिक राठोड, सिद्राम पवार, यशवंत राठोड,थावरू राठोड, गणेश चव्हाण, देविदास चव्हाण,महादेव राठोड, बाबुराव चव्हाण, व्यंकट राठोड, हरिष जाधव,रामू चव्हाण ग्रामसेवक अविनाश खुंटेगावे यांच्या सह संस्थेच्या शाळेतील प्राचार्य संतोष चव्हाण, मुख्याध्यापक विनायक राठोड, ए.जी.पवार, शिवाजी कवठे यांच्या सह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुंत्रसंचलन किरण कांबळे सर केले .






