Best News Portal Development Company In India

स्व अजितदादा पवार यांच्या जयंती निमीत्त उमरग्यात मोतीबिंद शस्त्रक्रिया शिबीर संपन्न!

स्व अजितदादा पवार यांच्या जयंती निमीत्त उमरग्यात मोतीबिंद शस्त्रक्रिया शिबीर संपन्न!

उमरगा /लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या जयंतीनिमित्त उमरगा शहरात जनसेवा सप्ताह निमित्त भव्य नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन राष्ट्रवादी परिवाराकडून करण्यात आले होते . शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुशीलअप्पा दळगडे तर प्रतिमापूजन नगरसेविका सौ . दिपाली बिराजदार यांच्या हस्ते करण्यात आले . कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मारुती पाटील , माजी नगरसेवक बापू बिराजदार , शहराध्यक्ष शंतनूभैया सगर ,सुनिल दळगडे ,,महादेवआप्पा दकगडे आदिती प्रमुख उपस्थिती होती .
राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराच्या वतीने डी के गार्डन पतंगे रोड उमरगा येथे आयोजित करण्यात आलेल्या या नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरासाठी उमरगा व परिसरातील रुग्णांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला .राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश दाजी बिराजदार यांनी या शिबिराची पाहणी केली .’
सोलापूर येथील शंकरशेठ साबळे नेत्र रुग्णालयाचे डॉ . सागर पवार , आरोग्य सेवक डॉ . अनंत क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती . शिबीरात ४२७ रूग्णांची तपासणी झाली यातील ५८ रुग्णांची शस्त्रक्रिया होणार असुन शस्त्रक्रियेसाठी रुग्णांना दि ५ ऑगस्ट रोजी सोलापूर येथील शंकरशेठ साबळे नेत्र रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे .
यावेळी अजित पाटील ,अनिल व्हंताळकर ,तानाजी कांबळे , धीरज कांबळे , राम शिंदे ,व्यंकट बिराजदार ,के डी कांबळे ,साई बिराजदार ,मारुती खराते , बालाजी खराते , कृष्णा मदनसुरे , धर्मराज व्हनाळे , शशीकांत कांबळे ,विकास कांबळे , सुनिल सुर्यवंशी , आंबादास बनसोडे यांच्यासह उमरगा शहरातील पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india