Best News Portal Development Company In India

येडोळा येथे भारतीय बौद्ध महासभा ग्राम शाखेचे उद्घाटन!

येडोळा येथे भारतीय बौद्ध महासभा ग्राम शाखेचे उद्घाटन
—————————————————–
नळदुर्ग (एस. के. गायकवाड):
तुळजापूर तालुक्यातील मौजे येडोळा येथे दि.२५ जुलै २o२६ रोजी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा ग्राम शाखा चे उद्घाटन जिल्हाध्यक्ष राजश्रीताई कदम यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे तुळजापूर तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर बनसोडे हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा सरचिटणीस विजय बनसोडे व प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ कार्यकर्ते कैलास गवळी गुरुजी,जिल्हा संस्कार विभाग उपाध्यक्ष बाळासाहेब बागडे,बौधाचार्य दादासाहेब बनसोडे, कैलास गायकवाड आदी उपस्थित होते.
. प्रारंभी तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करून अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना भारतीय बौध्द महासभेचे जिल्हा सरचिटणीस विजय बनसोडे म्हणाले की तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी संपूर्ण जगाला समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्यायाची व मानवतेची शिकवण दिली असून तथागत भगवान गौतम बुध्दाच्या विचारांचा आदर्श समोर ठेवून महामानव डॉ.बाबासाहेब आबेडकरानी देशतील सर्व नागरिकांना समान मानवी हक्क आणि मुलभुत आधिकार देणारे सर्वश्रेष्ठ भारतिय सविधान या देशाल दिले. प्रत्येक मानवाला आपापल्या धर्माच्या चौकटीत राहुन जिवन जगण्याचा आधिकार दिला असून बौध्द धम्म हा मानवी कल्याणचा मध्यम मार्ग आहे. तेंव्हा सर्व बहुजनानी बौद्ध धम्माचे अनुकरण करणे काळची गरज आहे.
यावेळी भारतीय बौद्ध महासभेच्या धाराशिव जिल्हा अध्यक्षा राजश्रीताई कदम यांच्या हस्ते येडोळा ग्राम शाखेचे उद्घाटन करून नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली ती पुढील प्रमाणे अध्यक्ष सुवर्णा लोंढे, सरचिटणीस रागिणी लोंढे,कोषाध्यक्ष रतन लोढे, उपाध्यक्ष सारिका भानुदास लोढे,संस्कार उपाध्यक्ष महादेवी लोढे,संस्कार सचिव उषाबाई लोंढे, संरक्षण सचिव सानिका लोंढे,महिला उपाध्यक्ष स्नेहा लोंढे,महिला सचिव शितल लोंढे, पर्यटन उपाध्यक्ष करुणा लोंढे,पर्यटन सचिव सुनीता लोढे,संघटक सुजाता लोंढे,सारिका नागेश नवसाबाई लोंढे,सुनिता वाघमारे,शालुबाई लोंढे,पार्वती लोढे, मनिषा काबले,अमित लोंढे,सागर गायकवाड,चिमनराव शिगर आदींची निवड करण्यात आली.
. या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे शरद बागडे कांचन चिमणे , प्रवीण मुखरे सुहास साबळे सिद्धार्थ बनसोडे, उमेश गायकवाड,सुरेश लोंढे, रामचंद्र लोंढे,देवानंद लोंढे, डॉ.सुरज लोंढे,भानुदास लोंढे, सह कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अमर जेटीथोर यांनी केले शेवटी गाथेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आल.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india