Best News Portal Development Company In India

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन….

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन….

उमरगा /लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.

उमरगा तालुक्यातील कराळी – तुरोरी परिसरातील श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी गुरूपौर्णिमा उत्सव बुधवार दि. २९ रोजी सायंकाळी ४:३० वाजता होणार आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, गुरूपौर्णिमेचे औचित्य साधून औराद शहा. ता. निलंगा येथून सोमवार दि. २७ रोजी सकाळी सदगुरु उज्वलानंद महाराज यांच्या पादुका, रथ, नगारा, टाळकरी, वारकरी, पताकाधारी, विनेकरी, रथातून पालखीत पादुका ठेवून हलगरा, थोर माकणी, तळीखेड पाटी, अनसरवाडा पाटी ते राज्य महामार्गावरून निलंगा येथील मंगल कार्यालयात हभप. महेश महाराज संताई आश्रम माकणी यांची सुश्राव्य किर्तन सेवा होत आहे. त्यानंतर मुक्काम होणार आहे. मंगळवार दि. २८ रोजी सकाळी सदगुरु उज्वलानंद महाराज यांच्या पादुका रथ हे निलंगा येथून दादगी, लिंबाळा, मदनसुरी मोड, भुतमुगळी, हरीजवळगा मार्गे हासोरी मुक्काम होणार आहे. या ठिकाणी हभप. दिवेगावकर महाराज यांची किर्तन सेवा होणार आहे.

गुरूपौर्णिमा बुधवार दि. २९ रोजी सकाळी हासोरी येथून कासार शिर्शी मार्गे उमरगा तालुक्यातील दुधनाळ पाटी, कदमापूर पाटी, कुन्हाळी, ञिकोळी पाटी, मुळज, तुरोरी मार्गे श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी गोल रिंगणाचे ठिकाणी येणार आहेत.

या रिंगणाच्या ठिकाणी बुधवार दि. २९ रोजी सकाळी कर्नाटक राज्यातील बसवकल्याण तालुक्यातील एकंबा, नवचंदवाडी, फुलदरवाडी, मळगीवाडी या चार गावातून हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत पालख्यांचे आगमण होणार आहे. एकुण पाच पालखीचे आगमण झाल्यानंतर टाळ मृदंगाच्या जयघोषात हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत घोड्यांचे गोल रिंगण सोहळा होणार आहे. एका घोड्यावर चोपदार तर दुसऱ्या घोड्यावर सदगुरु उज्वलानंद महाराज यांच्या पादुका ठेवून रिंगण सोहळा संपन्न होणार आहे.

गुरूपौर्णिमेच्या दिवशी बुधवारी संध्याकाळी ७ ते ९ या वेळेत हभप. अनिल महाराज पाटील बार्शी यांचे सुंदर सुश्राव्य किर्तन सेवा होणार आहे.

गुरूपौर्णिमेच्या दिवशी अचलबेट देवस्थान पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत सोहळा होणार असून सर्वजण उपस्थित रहावे असे आवाहन सेवक, भक्त परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india