Best News Portal Development Company In India

“मी अचानक येणार आहे .त्यावेळेस ही बँक अशीच स्वच्छ दिसली पाहिजे ” – स्व अजितदादा पवार!

“मी अचानक येणार आहे .त्यावेळेस ही बँक अशीच स्वच्छ दिसली पाहिजे ” – स्व अजितदादा पवार
– – – – – – –
स्व अजित दादांच्या आदेशाच पालन करत भाऊसाहेब बँकेचे स्वच्छता मोहीमेचे आयोजन
शब्द पाळणऱ्या दादांचे आम्ही कार्यकर्ते शब्दाला आम्ही जागतो – प्रा सुरेश बिराजदार.
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
कर्मचाऱ्यांसह चेअरमन , संचालक , अधिकाऱ्यांनीही हाती घेतला झाडू पोछा . ..
उमरगा : ” ईमारत देखनी झाली आहे ,मी जेव्हा केव्हा येणार तेव्हा ती स्वच्छ दिसली पाहिजे “या स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या भाऊसाहेब बिराजदार बँकेच्या इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत दादांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या जनसेवा सप्ताह निमित्त शहरातील भाऊसाहेब बिराजदार अर्पण को-ऑपरेटिव्ह बँकेने दि २७ रोजी स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते .या स्वच्छता मोहिमेत कर्मचाऱ्यांसह चेअरमन ,संचालक , अधिकाऱ्यांनीही हाती झाडू पोछा घेत स्वच्छता केली .यावेळी चेअरमन प्रा .सुरेशदाजी बिराजदार ,शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्षा सौ .शैलजाताई मगर , जि प सदस्य सविताताई बिराजदार ,नगरसेविका दिपाली बिराजदार , डॉ .अनुराधा जवळगे , सौ .सुकेशनी बिराजदार यांची प्रमुख उपस्थिती होती .
या स्वच्छता मोहिमेप्रसंगी बोलताना चेअरमन प्रा सुरेश दाजी बिराजदार यांनी दादा विकासकामानप्रती जितके तत्पर होते .तितकेच ते स्वच्छतेसाठी सजग होते .भाऊसाहेब बँकेच्या ईमारतीच्या उद्घाटन प्रसंगी त्यांनी मी अचानक येणार आहे .त्यावेळेस ही बँक अशीच स्वच्छ दिसली पाहिजे बँकेच्या कर्मचाऱ्यांनी पण ग्राहकांशी सौजन्याने वागले पाहिजे असे आवाहन केले होते .तेव्हा आम्ही बँकेच्या वतीने बँक स्वच्छ ठेवण्याचा दादांना शब्द दिला होता .शब्द पाळणऱ्या दादांचे आम्ही कार्यकर्ते आहोत .आम्हीही शब्दाला जागत दादांच्या जयंतीनिमित्त ईमारतीची स्वच्छता करत व विविध सामाजिक उपक्रम राबवत दादांना श्रद्धांजली अर्पण करीत आहोत .असे भावपूर्ण उद्गार काढले .
या स्वच्छता मोहिमेसाठी बँकेचे संचालक अधिकारी कर्मचारी यांनी सहभाग नोंदवत बँक व परिसराची स्वच्छता केली .चेअरमन प्रा बिराजदार यांच्या हस्ते दादांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले .यावेळी दादांच्या आठवणीने उपस्थित सर्वजण भाऊक झाले होते .यावेळी बँकेचे संचालक सुनील माने , विजयकुमार सोनवणे ,राहुल पाटील ,सतीश इंगळे , रामकृष्ण बिराजदार मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश शहापुरे ,कर्ज विभाग प्रमुख दयानंद बिराजदार ,चिप अकाउंटंट संदीप जाधव ,आयटी विभाग प्रमुख विजय चव्हाण ,राहुल गुरव ,चारुदत्त कांबळे ,ब्रिजेश बिराजदार, सतीश सुरवसे, मेघा जगदाळे ,विनोद जाधव,तुषार चव्हाण ,परमेश्वर शेटगार ,वर्षाराणी बिराजदार ,भावना बिराजदार ,मनोज देशपांडे,वैष्णवी चव्हाण ,प्रीती बिराजदार ,राजू राठोड बळी चव्हाण विकास सरपे भीम बनसोडे ,बालाजी पुरी नामदेव जाधव , गोविंद येवते , दिगंबर जाधव ,आधी सह कर्मचारी उपस्थित होते .

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india