Best News Portal Development Company In India

दि. २८ जुलै २०२६ : महाराष्ट्र शासनाच्या “छत्रपती शिवाजी महाराज! महाराजस्व समाधान शिबीर अभियान” अंतर्गत आज २४१ – तुळजापूर विधानसभा मतदारसंघस्तरीय!

दि. २८ जुलै २०२६ : महाराष्ट्र शासनाच्या “छत्रपती शिवाजी महाराज!
महाराजस्व समाधान शिबीर अभियान” अंतर्गत आज २४१ – तुळजापूर विधानसभा मतदारसंघस्तरीय
तुळजापूर प्रतिनिधी;- महाराजस्व समाधान शिबीर वंश मंगल कार्यालय, तुळजापूर येथे उत्साहात व यशस्वीरीत्या पार
पडले.
या शिबिरास मा. आमदार श्री. राणाजगजितसिंह पाटील यांच्या शुभहस्ते
कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी श्री. बसवराज धरणे, पंचायत समिती सभापती श्री. विक्रमसिंह
फत्तेसिंह देशमुख, अपर जिल्हाधिकारी, श्रीमती ज्योती पाटील, यांच्यासह विविध विभागांचे
अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.मा. मुख्यमंत्री यांच्या
वाढदिवसानिमित्त व स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जंयती निमीत्त राबविण्यात
येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान अंतर्गत या शिबिरास सुमारे 1400
नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध शासकीय योजनांचा लाभ घेतला.
शिबिरामध्ये नगर परिषद तुळजापूर, नगर परिषद नळदुर्ग, आरोग्य विभाग, सामाजिक
न्याय व विशेष सहाय्य विभाग, उपअधीक्षक भूमी अभिलेख, वन विभाग, महिला व बाल विकास
विभाग, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, सह दुय्यम
निबंधक कार्यालय, आरटीओ / वाहतूक शाखा, तुळजापूर पोलीस स्टेशन, जिल्हा कौशल्य विकास,
रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ,
पंचायत समिती तुळजापूर, पोस्ट कार्यालय, तहसील कार्यालय तुळजापूर व लोहारा आदी विभागांनी
सहभाग नोंदवून नागरिकांना विविध योजनांची माहिती, प्रत्यक्ष लाभ तसेच अर्ज स्वीकारण्याची
सुविधा उपलब्ध करून दिली.
या शिबिरात एकूण 1050 नागरिकांना प्रत्यक्ष लाभ देण्यात आले, तर 749 नागरिकांचे विविध
योजनांसाठी अर्ज स्वीकारण्यात आले.शिबिरामध्ये घरकुल योजना, आयुष्मान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजना,
दिव्यांग लाभ, आरोग्य तपासण्या, पीएम किसान, कृषी यंत्रीकरण, रोजगार व कौशल्य विकास,
महिला व बाल विकास, बालसंगोपन, लेक लाडकी योजना, वन विभागाच्या योजना, पोस्ट
विभागाच्या बचत व विमा योजना, शिधापत्रिका वितरण, डिजिटल ७/१२ वाटप, विविध प्रमाणपत्रे व
दाखल्यांचे वितरण, फार्मर आयडी वाटप, सायबर जनजागृती, वाहतूक नियमांविषयी मार्गदर्शन
तसेच महसूल विभागाच्या विविध सेवा नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात
आल्या.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. ओंकार देशमुख उपविभागीय अधिकारी,
धाराशिव,तहसीलदार श्री. अरविंद बोळणे, अपर तहसीलदार श्री. पुरुषोत्तम कोकरे, अपर तहसीलदार
श्री. प्रमोद गायकवाड, निवासी नायब तहसीलदार श्रीमती प्रियंका लोखंडे, तसेच सर्व विभागांचे
अधिकारी, कर्मचारी आणि समन्वय पथक यांनी विशेष परिश्रम घेतले.
शासनाच्या विविध विभागांनी समन्वयाने काम करून नागरिकांना त्यांच्या दारी
शासनाच्या योजनांचा लाभ उपलब्ध करून दिल्यामुळे उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले
आणि या उपक्रमाचे स्वागत केले.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india