Best News Portal Development Company In India

धाराशिव पोलीस स्टेशनची जिल्हाभरात अवैद्य धंद्याविरुद्ध१३ ठिकाणी धडाकेबाज कारवाया

अवैद्य मद्य विरोधी विशेष मोहिमेदरम्यान जिल्हाभरात १३ कारवाया केल्या आहेत.
माननीय पोलीस अधीक्षक रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली काल बुधवार दि.19.11.2025 रोजी रोजी अवैद्य मद्य विरोधी विशेष मोहीम विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान तेरा कारवया करण्यात आल्या. या छाप्यात आढळलेला गावठी दारू निर्मिती सुमारे 6,400 लिटर आंबवलेले रासायनिक द्रव्य हे नाशवंत असल्याने ते जागीच ओतून नष्ट करण्यात आले. तर सुमारे664 रुपये किमतीची गावठी देशी -विदेशी दारूच्या 13 सीलबंद बाटल्या असे मद्य जप्त करण्यात आले. सदर ओतून दिलेला मध्यार्क निर्मितीचा अर्क, मध्य निर्मितीच्या साहित्य त्याची किंमत अंदाजे 6,01,450 रुपये इतकी आहे. यावरून महाराष्ट्र मद्य मनाई कायद्यांतर्गत संबंधित पोलीस ठाण्यात 13गुन्हे खालील प्रमाणे नोंदवण्यात आले .
1) ढोकी पोलीस ठाण्याच्या पथकाने २ ठिकाणी छापे टाकले.
२) तामलवाडी पोलीस ठाण्याच्या पथकाने २ ठिकाणी छापे टाकले.
३) लोहारा पोलीस ठाण्याच्या पथकाने ३ ठिकाणी छापे टाकले.
४) कळंब पोलीस ठाण्याच्या पथकाने २ ठिकाणी छापे टाकले.
५) आनंदनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने १ ठिकाणी छापा टाकला.
६) मुरूम पोलीस ठाण्याच्या पथकाने १ ठिकाणी छापा टाकला.
७) परांडा पोलीस ठाण्याच्या पथकाने १ ठिकाणी छापा टाकला.
८) आंबी पोलीस ठाण्याच्या पथकाने १ ठिकाणी छापा टाकला.
या कारवाईने कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम युद्ध पातळीवर धाराशिव पोलीस स्टेशनने हाती घेतले आहे असे समजते. सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india