Best News Portal Development Company In India

मुळज जिल्हा परिषद शाळेत ईंग्रजी विषयाचे शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय.

मुळज जिल्हा परिषद शाळेत ईंग्रजी विषयाचे शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय.

उमरगा /लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
शाळा सुरू होऊन दोन महिने उलटले परंतु मुळज जिल्हा परिषद शाळेत इंग्रजीचे शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. यामुळे पालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देऊन ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला होता. यांची दखल घेत मुख्यमंत्री बळीराजा शेतपानंद रस्ते योजना समितीचे सहअध्यक्ष शरण पाटील यांनी मुळज शाळेला भेट दिली. यावेळी शिक्षणाधिकाऱ्यांना फोन करुन दोन दिवसांत इंग्रजीसाठी शिक्षक देण्याची सुचना दिली.
तालुक्यातील मुळज जिल्हा परिषद प्रशालेत पाचवी ते दहावीपर्यंत शाळेत २५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. नववी व दहावीत ९६ विद्यार्थी आहेत. इंग्रजी विषय शिक्षकांची ३० एप्रिल २०२६ मध्ये एससी आरटी पुणे येथे विषय सहाय्यक म्हणून अभ्यासक्रमासाठी निवड झाल्याने येथे इंग्रजीसाठी शिक्षक नाहीत. हिंदी व इंग्रजी सारख्या महत्त्वाच्या विषयासाठी शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत याचा विपरीत परिणाम होणार असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याला धोका निर्माण झाला आहे. यामुळे मुळज येथील पालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देऊन ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला होता. यांची दखल घेत मंगळवारी (दि.२८) मुख्यमंत्री बळीराजा शेतपानंद रस्ते योजनेचे अध्यक्ष शरण पाटील यांनी गट शिक्षणाधिकारी यांना सोबत घेऊन मुळज जिल्हा परिषद शाळेला भेट दिली. यावेळी पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. श्री पाटील यांनी शिक्षणाधिकारी खंदारे यांना फोन करुन मुळज शाळेला दोन दिवसांत शिक्षक देण्याची सुचना दिली. यावेळी गटशिक्षणाधिकारी अमोल राजपूत, शालेय समितीचे अध्यक्ष संजय मुगळे, भाजपाचे उमरगा ग्रामीण तालुकाध्यक्ष प्रल्हाद काळे, अनिल सगर, सदानंद पाटील, महेश माशाळकर, महालिंग बाबवेट्टी, राहुल पवार, विजय सोनकटाळे, राजु मुल्ला, मुख्यध्यापक वसंत जाधव, माजी विद्यार्थी समितीचे अध्यक्ष किशोर माडजे, व्यंकट रेड्डी, बाळासाहेब कोकळे, राहुल पवार, दस्तगीर पटेल, शिवाजी चव्हाण, अभिमन्यू पांचाळ, अभिमन्यू अंबुलगे,रमेश मुळजे,स्वप्नील वनकुंद्रे, रवी चालुक्य, रोहित पांचाळ, श्रीकर बिराजदार, मारूती जमादार, आकाश जमादार, गणेश जमादार, रितेश भोसले, अनिकेत जमादार, शंकर जमादार आदीसह पालक व शिक्षक उपस्थित होते.
‌‌

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india