गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी भाविक भक्तांची मांदियाळी.
हजारो भाविक भक्त गणाच्या सानिध्यात घोड्यांचे गोल रिंगणाचे दर्शन.
उमरगा /लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
उमरगा तालुक्यातील कराळी – तुरोरी परिसरातील श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी गुरूपौर्णिमा उत्सवाचे औचित्य साधून बुधवार दि. २९ रोजी सायंकाळी ४:३० वाजता रिंगण सोहळा कर्णाटक अंध्रप्रदेश महाराष्ट्र भाविक भक्त गणासमवेत थाटामाटात रिंगण सोहळा पार पडला.
औराद शहा. ता. निलंगा येथून सोमवार दि. २७ रोजी सकाळी सदगुरु उज्वलानंद महाराज यांच्या पादुका, रथ, नगारा, टाळकरी, वारकरी, पताकाधारी, विनेकरी, रथातून पालखीत पादुका ठेवून हलगरा, थोर माकणी, तळीखेड पाटी, अनसरवाडा पाटी ते राज्य महामार्गावरून निलंगा येथील मंगल कार्यालयात हभप. महेश महाराज संताई आश्रम माकणी यांची सुश्राव्य किर्तन सेवा पार पडुन मंगळवार दि. २८ रोजी सकाळी सदगुरु उज्वलानंद महाराज यांच्या पादुका रथ हे निलंगा येथून दादगी, लिंबाळा, मदनसुरी मोड, भुतमुगळी, हरीजवळगा मार्गे हासोरी मुक्काम करून हभप. दिवेगावकर महाराज यांची किर्तन सेवा संपन्न झाली.
गुरूपौर्णिमा बुधवार दि. २९ रोजी सकाळी हासोरी येथून कासार शिर्शी मार्गे उमरगा तालुक्यातील दुधनाळ पाटी, कदमापूर पाटी, कुन्हाळी, ञिकोळी पाटी, मुळज, तुरोरी मार्गे श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी गोल रिंगणाचे ठिकाणी प्रस्थान झाली.
या रिंगणाच्या ठिकाणी बुधवार दि. २९ रोजी सकाळी कर्नाटक राज्यातील बसवकल्याण तालुक्यातील एकंबा , व.महाराष्ट्र मळगीवाडी येथिल भाविक भक्त गणासमवेत तालुक्यातील आष्टा (जहागीर) येथिल संतयोगी दामोदर मठ संस्थान येथे अगमन होताक्षणी संतयोगी दामोदर मठ संस्थानचे मठाधिपती १००८ महंत अवधुतपुरी महाराज यांनी सद्गुरू उज्वलानंद महाराज पालखीचे यथोचित स्वागत करीत भाविक भक्तांना महाप्रसाद भोजनाचे वाटप करण्यात आले .
तदनंतर झानवचंदवाडी, फुलदरवाडी, या चार गावातून हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत पालख्यांचे आगमण ततुरोरी येथे संगम झाले एकुण पाच पालखीचे आगमण झाल्यानंतर टाळ मृदंगाच्या जयघोषात हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत घोड्यांचे गोल रिंगण सोहळा अचलबेट पायथ्याशी एका घोड्यावर चोपदार तर दुसऱ्या घोड्यावर सदगुरु उज्वलानंद महाराज यांच्या पादुका ठेवून रिंगण सोहळा संपन्न करण्यात आला.
गुरूपौर्णिमेच्या दिवशी अचलबेट देवस्थान पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत सोहळा पार पडला.
यावेळी आमदार प्रवीण स्वामी,धाराशिव,लातुर बिड विधानपरिषदेचे आमदार बसवराज पाटील, धाराशिव जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष उषाताई गायकवाड, उमरगा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष किरण भैय्या गायकवाड, जिल्हा परिषदेच्या सदस्या अर्चना जाधव , ह.भ.प भिम महाराज,ह.भ.प.हरी महाराज लवटे,पंचायत समितीचे सदस्य तुकाराम( भैय्या) जाधव, क्रषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बसवराज कस्तुरे, माजी पंचायत समिती उप सभापती युवराज जाधव,सरपंच मयुरी जाधव,माजी उपसरपंच पंडित शिंदे, पत्रकार बालाजी माणिकवार,तंटामुक्ती अध्यक्ष पवन जाधव, पंचायत समितीचे सदस्य दगडु मोरे, योद्धा फाउंडेशनचे प्रदिप जाधव,जेष्ठ नेते आशोक कारभारी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते प्रताप तपसाळे, पंच संजय जाधव, नितिन जाधव, माजी सरपंच ज्ञानेश्वर पाटील, माजी सरपंच माधव जाधव, माजी पंचायत समिती सदस्य मारुती थोरे,ग्रामपंचायत सदस्य विकास( दादा )जाधव, सौदागर सुर्यवंशी, कमलाकर जाधव,तुकाराम मंमाळे, संजय पाटिल, ज्ञानेश्वर पाटिल, शाहुराज भोसले, अदिसह पंंचक्रोशितील हजारो भाविक भक्त गण उपस्थित होते.
कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी उमरगा पोलीस ठाणे निरिक्षक प्रल्हाद सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली तुरोरी बिट अमलदार अनिरुद्र कावळे पोलीस हरुन सय्यद यांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.








