Best News Portal Development Company In India

तुळजापूर तहसील कार्यालयावर उद्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) चा भव्य महामोर्चा!

तुळजापूर तहसील कार्यालयावर उद्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) चा भव्य महामोर्चा!
​तुळजापूर प्रतिनिधी:- निराधार योजनांमधील विविध प्रलंबित मागण्यांसाठी आणि राज्य व केंद्र सरकारच्या धोरणांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने उद्या, दिनांक ३० जुलै २०२६ रोजी तुलजापूर तहसील कार्यालयावर ‘भव्य महामोर्चा’ चे आयोजन करण्यात आले आहे.
​संंजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना यांसारख्या विविध निराधार योजनांमधील लाभार्थ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि निराधार घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी पक्षाच्या वतीने हा एल्गार पुकारण्यात आला आहे.
​ठळक बाबी:
​दिनांक: ३० जुलै २०२६
​स्थळ: तहसील कार्यालय, तुलजापूर
​प्रमुख मुद्दा: निराधार योजनांमधील विविध प्रलंबित मागण्या आणि महाराष्ट्र/केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने.
​संयोजक: श्री अशोक आगतराव जाधव (माजी सरपंच – काटी, जिल्हा उपाध्यक्ष – रा.कॉ. पार्टी श.प., धाराशिव)
​या मोर्चात नागरिक, लाभार्थी आणि पक्ष कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india