*एमटीएस परीक्षा पहिली ते दहावीपर्यंत असली पाहिजे*
*आमदार प्रवीण स्वामी*
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
एम टी एस परिक्षेत राज्याच्या गुणवत्ता यादीत चमकलेल्या गुणवंताच्या पाठीवर मान्यवरांकडून कौतुकाची थाप
तालुक्यातील सात शाळांना एमटीएस बेस्ट स्कूल अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले.
उमरगा एमटीएस परीक्षेच्या माध्यमातून उमरगा तालुक्यातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत उतुंग भरारी घेतलेली आहे या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार प्रसंगी उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार प्रवीण स्वामी यांनी मत व्यक्त केले यावेळी उमरगा पंचायत समितीच्या सभापती अँड आकांक्षा चौगुले विद्या आराधना अकॅडमीचे संचालक प्रा.सतीश पवार एम टी एस चे जिल्हा प्रतिनिधी एडके सर जिल्हा परिषद हायस्कूल उमरग्याचे मुख्याध्यापक पद्माकर मोरे उपस्थित होते. पुढे बोलताना आमदार प्रवीण स्वामी म्हणाले की पालकांनी आपली स्वप्ने विद्यार्थ्यां मध्ये अवश्य पहावी परंतु ते विद्यार्थ्यावर लादू नयेत विद्यार्थ्यांना कोणत्या क्षेत्रात आपले करिअर करायचे आहे ते विद्यार्थ्यांना करू द्यावे एमटीएस परीक्षेमुळे विद्यार्थ्यांचा पाया भक्कम होत आहे आणि स्पर्धा परीक्षेची तयारी पहिलीपासूनच होत असल्यामुळे विद्यार्थ्यांना सर्व स्पर्धा परीक्षा सोप्या वाटत आहे त्यामुळे पहिली ते सातवी पर्यंत असलेली एमटीएस स्पर्धा परीक्षा ही दहावीपर्यंत असणे काळाची गरज बनली आहे. सभापती अँड आकांक्षा चौगुले यांनी तालुक्यातील एमटीएस होल्डर सर्व विद्यार्थ्यांचे व पालकांचे कौतुक करून स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी सर्वतोपरी मदत माझ्याकडून केव्हाही करण्यात येईल असे जाहीर केले हुशार विद्यार्थी हे आई-वडिलांची देणगी नसून ते उमरगा तालुक्याचे ही दैवत आहेत त्यामुळे अशा विद्यार्थ्यांच्या सतत पाठीशी राहणे माझे कर्तव्य आहे. सतीश पवार म्हणाले की वेगाने शिक्षण क्षेत्रात होणारे परिवर्तन हे पालक आणि विद्यार्थ्यांसाठी आव्हानात्मक आहे या जगात आपण विद्यार्थ्यांना घडवत असताना विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा आणि त्याच्या क्षमतेचा विचार करून पालकांनी विचारपूर्वक निर्णय घेणे गरजेचे आहे यावेळी एमटीएस स्पर्धा परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तालुक्यातील डॉक्टर के डी शेंडगे, कुमार स्वामी प्राथमिक विद्यामंदिर उमरगा ,स्वामी विवेकानंद प्राथमिक मंदिर उमरगा, डॉक्टर के डी शेंडगे सीबीएसई स्कूल उमरगा, ओरियन इंग्लिश स्कूल उमरगा, जिल्हा परिषद हायस्कूल उमरगा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा त्रिकोळी, या सात शाळांना एमटीएस बेस्ट स्कूल अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले पाचवी स्कॉलरशिप मध्ये राज्याच्या गुणवत्ता यादीत नववा आलेला मंदार बिराजदार दुसरी एमटीएस मध्ये तालुक्यात प्रथम आलेला वीर बिराजदार तिसरी एमटीएस मध्ये तालुक्यात प्रथम आलेला तेजस सोनकांबळे चौथी एमटीएस राज्याच्या गुणवत्ता यादीत चौथ्या क्रमांकावर आलेला प्रणव बोरोळे सहावी एमटीएस मध्ये तालुक्यात प्रथम आलेली शौर्या पाटील व सातवी एम पी एस मध्ये तालुक्यात प्रथम आलेल्या खुशी राठोड यांच्याबरोबर इतर 75 यशस्वी विद्यार्थ्यांचा ट्रॉफी प्रशस्तीपत्रक व सुवर्णपदक देऊन सत्कार मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक व एमटीएस प्रमुख पद्माकर मोरे यांनी केले तर सूत्रसंचालन भाग्यश्री पंडित तर आभार प्रतीक्षा मोरे यांनी मानले.







