प्रा. दत्तात्रय पाठक यांचा सेवापुर्ती सोहळा उत्साहात !
उमरगा /लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
येथील आदर्श कनिष्ठ महाविद्यालयातील भौतिक शास्त्र विभागातील प्राध्यापक दत्ताञय पाठक यांचा आदर्श महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागाच्या वतीने सेवापूर्ती सन्मान करण्यात आला.
३१ जुलै प्रा. दत्तात्रय पाठक हे नियत वयो माना नुसार सेवा निवृत्त झाले. त्या बद्दल आदर्श महाविद्यालयातील भौतिक विभागातील आजी माजी प्राध्यापक – शिक्षेकेत्तर कर्मचारी यांच्या वतीने प्रा. पाठक यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य सोमशंकर महाजन होते. यावेळी आदर्श महाविद्यालयाच्या भौतिक शास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रा.डॉ . राजशेखर रामशेट्टी ,प्रा.डॉ . उदय दिंडोरे,प्रा . डॉ. सतीश आलगुडे प्रा. गोविंद रसाळ ,प्रा. प्रशांत माशाळकर ,प्रा. मनोज शेंडगे , आनंद झळके यांची प्रमुख उपस्थिती होती.
माजी प्राचार्य सोमशंकर महाजन यांनी प्रा. पाठक यांच्या यशस्वी जीवनाच्या पार्श्वभूमीचा आढावा घेतला. मारुती कदम यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्रा.डॉ . राजशेखर रामशेट्टी यांनी केले. आभार प्रा. मनोज शेंडगे यांनी मानले.







