पत्रकार हा शासन आणि प्रशासन यामधील एक महत्त्वाचा दुवा आहे : सुनीलभाऊ बनसोडे!
——————————————————–
नळदुर्ग (एस.के.गायकवाड)
पत्रकार हा शासन आणि प्रशासनातील एक महत्त्वाचा दुवा असून पत्रकारांनी निपक्षपातीपणे पत्रकारिता करून सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी शासन दरबारी मांडण्याचा प्रयत्न करावा असे प्रतिपादन धाराशिव जिल्हा परिषद चे जिल्हा परिषद सदस्य तथा आंबेडकरी चळवळीतील नेतृत्व सुनील भाऊ बनसोडे (काटी सावरगाव) यांनी नळदुर्ग येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना केले.
. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई तालुका शाखा तुळजापूर,डॉ आंबेडकर इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल नळदुर्ग व मित्रपरिवारांच्या वतीने जिल्हा परिषद सदस्य सुनील भाऊ बनसोडे, तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई च्या मराठवाडा विभाग सचिव/संपर्कप्रमुख पदी जळकोट तालुका तुळजापूर येथील पत्रकार अरुण लोखंडे यांची निवड झाल्याबद्दल तसेच विशाल भालेराव यानी पोलीस दलामध्ये सुरक्षारक्षक पोलीस कॉन्स्टेबल म्हणून पदभार स्वीकारल्या बदल या तिघांच्या सत्कार समारंभाचे आयोजन डॉ.आंबेडकर इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल नळदुर्ग येथे करण्यात आले होते. याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना सुनील भाऊ बनसोडे बोलत होते. तर पत्रकार अरुण लोखंडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की पत्रकारिता मणजे काटेरी वाट असून कार्यकर्त्यांनी आणि पत्रकारांनी प्रामाणिकपणे निष्ठेने आपल्या कामावर निष्ठा ठेवून काम केल्यास निश्चितच आपल्या कामाचे मूल्यमापन समाजाकडून केले जाते तेंव्हा पत्रकार आणि कार्यकर्त्यांनी निष्ठेने व प्रामाणिकपणे काम करावे.माझी झालेली निवड ही आपल्या सर्वांच्या सहकार्याने मी करत असलेल्या कामाची दखल पत्रकार संघाने घेतली असेच म्हणावे लागेल. या माझ्या निवडीमध्ये आपल्या सर्वांचा तितकाच सहभाग आहे असे मी मानतो.
.या प्रसंगी जेष्ठ कार्यकर्ते कैलास गवळी गुरुजी,अनिल गायकवाड सर, डॉ.आंबेडकर इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक मारुती कारवे आदींची शुभेच्छा पर भाषणे झाली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे एस.के. गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन पत्रकार शामकांत नागीले यांनी केले.
. यावेळ पत्रकार विजय पिसे, सतीश राठोड,आकाश अलकुंटे,सामाजिक कार्यकर्ते विनोद जाधव,महादेव मोरे, दत्तात्रय कांबळे धर्मराज देडे , अरविंद लोखंडे, बाबा कांबळे, उमेश गायकवाड,भीमराव जाधव,अजय दुपारगुडे,राकेश बनसोडे, प्रकाश माने,बंटी माने,सह कार्यकर्ते उपस्थित होते.








