अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त जवळगा मेसाई जिल्हा परिषद शाळा येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन कार्यक्रम संपन्न!
तुळजापूर प्रतिनिधी:-जिल्हा परिषद शाळा जवळगा मेसाई येथ मातंग समाजाचे आराध्य दैवत, लोकशाहीर आणि थोर समाजसुधारक अण्णाभाऊ साठे यांची जयंती जिल्हा परिषद शाळा जवळगा मेसाई येथे अत्यंत उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमादरम्यान अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या महान विचारांना व सामाजिक योगदानाला उजाळा देण्यात आला.
या विशेष प्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) चे जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब मस्के यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. त्यांच्यासोबतच गावातील आणि परिसरातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून लोकशाहीरांना अभिवादन केले.
कार्यक्रमाला गावातील राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील खालील प्रमुख व्यक्तींची उपस्थिती लाभली.
बाबासाहेब मस्के (जिल्हा कार्याध्यक्ष, RPI)
दादासाहेब चौधरी (माजी उपसरपंच)
देवानंद मस्के (ग्रामपंचायत सदस्य)
रघुनाथ गाढवे * संदीप वाघ * रघुनाथ मस्के
या जयंती सोहळ्याला शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. यामध्ये मुख्याध्यापक भोसले सर, घुटे सर, टकले सर, क्षीरसागर सर, सोनवणे सर, कांबळे मॅडम आणि नलावडे मॅडम या सर्व शिक्षकवृंदाचा समावेश होता.
कार्यक्रमा दरम्यान उपस्थितांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील आणि विचारांतील क्रांतिकारक पैलूंवर प्रकाश टाकला. अण्णाभाऊंनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून शोषित, पीडित आणि कष्टकरी समाजाचे प्रश्न मांडून जगाला एक नवी दिशा दिली, असे उद्गार मान्यवरांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
हा सोहळा सर्व उपस्थितांच्या उत्साहात आणि अण्णाभाऊंच्या विचारांचा गजर करत यशस्वीपणे पार पडला.








