Best News Portal Development Company In India

राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग विभागातर्फे विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप!

राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग विभागातर्फे विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

डोंबिवली, दि. २ ऑगस्ट : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट) उद्योग विभागाच्या वतीने जुनी डोंबिवली (पश्चिम) येथील नेमाडे गल्लीतील पक्ष कार्यालयात रविवारी विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्यावाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला डोंबिवली, दिवा व परिसरातील अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत वह्यांचा लाभ घेतला.

शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देत सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम भविष्यातही सातत्याने राबविण्यात येतील, असा निर्धार पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (उद्योग विभाग) मुंबई विभाग अध्यक्ष अश्विन केळकर, मुंबई विभागीय सचिव प्रा. दिपक जाधव, समाजसेवक शाम चौगले, मध्य मुंबई अध्यक्ष संदीप उबाळे, मुंबई विभाग उपाध्यक्ष डॉ. उदयराज तळेकर, कार्यालय प्रमुख रवींद्र शिंदे, कल्याण-डोंबिवली शहर अध्यक्ष व्यंकटेश नायडू, पश्चिम मुंबई अध्यक्ष सुजित गुप्ता यांनी विशेष परिश्रम घेतले.

तसेच शैलेश प्रधान, अजय राजापूरकर, हंसू अली, संदीप पालव, निर्मिती सावरकर, रसाळ साहेब, हिमांशू तिळवे, नित्यानंद पुजारी, जितेंद्र अडसूळ, सुधाकर शिवनेकर आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाचे योगदान दिले.

या उपक्रमाचे विद्यार्थी, पालक आणि परिसरातील नागरिकांनी स्वागत करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (उद्योग विभाग) यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india