Best News Portal Development Company In India

गुंजोटी येथे बुद्धविहारात वर्षावासास उत्साहात प्रारंभ. उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.

गुंजोटी येथे बुद्धविहारात वर्षावासास उत्साहात प्रारंभ.
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
(दि. ०२)रविवार रोजी वर्षावास कार्यक्रमास प्रारंभ गुंजोटी भीमनगर येथील जेतवन बुद्ध विहारात वर्षावास कार्यक्रमास उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. या कार्यक्रमाला बौद्ध उपासक-उपासिका तसेच विद्यार्थी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे बौद्धाचार्य आदरणीय मिलिंद डोईबोळे सर, भारतीय बौद्ध महासभेचे माजी अध्यक्ष व आमचे मार्गदर्शक आदरणीय संतोषजी सुरवसे साहेब, तसेच आदरणीय बालाजी कोनाळे सर यांनी आवर्जून उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून बौद्ध धम्माच्या चळवळीला अधिक बळकटी देण्यासाठी प्रत्येकाने प्रामाणिकपणे कार्य करण्याची आवश्यकता व्यक्त केली. स्वतःचा आणि समाजाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर अंधश्रद्धा, कर्मकांड आणि अवैज्ञानिक विचारांचा त्याग करून भगवान बुद्धांनी दाखविलेल्या धम्ममार्गाचा स्वीकार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
वर्षावासाचे महत्त्व स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, हा उपक्रम व्यक्तीच्या चारित्र्यनिर्मितीसह समाजाला प्रगतीच्या मार्गावर नेणारा आहे. त्यामुळे सर्व धम्मबंधूंनी वर्षावास कालावधीत नियमितपणे बुद्ध विहारात उपस्थित राहून धम्मवाचन, धम्मचर्चा आणि धम्मसाधनेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. विहारामध्ये बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन करण्यात आले ग्रंथाचे वाचन उपासक संदीप कांबळे यांनी केले.
विशेष म्हणजे, गुंजोटी येथील वर्षावास उपक्रम सलग दहा वर्षांपासून अखंडपणे सुरू असून, हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी बौद्ध विकास मंडळ, भीमनगर गुंजोटी, रमाबाई महिला मंडळ, भीमनगर गुंजोटी आणि रमापती विद्यार्थी संघ, भीमनगर गुंजोटी यांनी सातत्याने परिश्रम घेतले आहेत. त्यांच्या नियोजनबद्ध कार्यामुळे हा कार्यक्रम दरवर्षी अत्यंत शिस्तबद्ध आणि यशस्वीपणे पार पडत आहे.
या पवित्र धम्मकार्याला प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचे, कार्यकर्त्यांचे, उपासक-उपासिकांचे आणि विद्यार्थी बांधवांचे मनःपूर्वक आभार मान्यवरांनी मानले.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india