गौरिशकर मुळे यांचा परिवर्तन कडून सत्कार!
———————————————–
नळदुर्ग (एस.के.गायकवाड ):
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे निषावंत कायेकर्ते गौरीशंकर सिद्रामप्पा पुळे यांचा परिवर्तन सामाजिक संस्थेचे सचिव मारुती बरसोडे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
.गौरीशंकर सिद्रामप्पा मुळे रा. बोरगाव (तुपाचे) ता. तुळजापूर यांची राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल परिवर्तन सामाजिक संस्था बोरगाव/नळदुर्ग चे संस्थापक सचिव मारुती बनसोडे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. गौरीशंकर मुळे यांचे आजोबा आनंदराव बसवंतराव मुळे हे काँग्रेस पक्षाचे सरपंच म्हणून ३० वर्षे गावात काम केले होते तर सिद्रामप्पा मुळे हे तुळजापूर तालुका अध्यक्ष म्हणून काम केले आहेत.गेली ५० वर्षे मुळे कुटुंब काँग्रेसचे निष्ठावंत म्हणून तालुक्याला आणि जिल्ह्याला परिचित आहेत आता त्यांच्या तिसऱ्या पिढीतील उच्च शिक्षित गौरीशंकर मुळे यांना जिल्हास्तरावर काम करण्याची संधी मिळाली आहे. ते आधी किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष होते आता त्यांना मुख्य कार्यकारिणीत जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे.यावेळी राजशेखर कलशेट्टी,डॉ.इस्माईल शेख, फय्याज सय्यद, राहुल जाधव, सुधीर गायकवाड, शरणप्पा मुळे, विश्वनाथ गायकवाड,समद सय्यद सह अनेक जण उपस्थित होते.







