धाराशिव पोलिसांचा अवैध दारू धंद्यांवर सर्जिकल स्ट्राईक! पाटील तांड्यावर ‘मास रेड’; ५ लाखांचा मुद्देमाल जप्त, १४ जणांवर गुन्हे दाखल!
तुळजापूर प्रतिनिधी;-
जिल्ह्यात अवैध दारू निर्मिती आणि विक्री करणाऱ्यांविरोधात धाराशिव पोलिसांनी अत्यंत धडक कारवाई केली आहे. मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर यांच्या थेट आदेश व मार्गदर्शनाखाली तुळजापूर तालुक्यातील मौजे पाटील तांडा (खुदावाडी) येथे भव्य ‘मास रेड’ (Mass Raid) टाकून पोलिसांनी अवैध दारूचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत.
RCP प्लाटूनसह संयुक्त पथकाचा छापा
उपविभागीय पोलीस अधिकारी मा. मनोहर पाटील यांच्या नेतृत्वाखाली नळदुर्ग, तामलवाडी, तुळजापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार, धाराशिव मुख्यालयाची एक आर.सी.पी. (RCP) प्लाटून तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.
५ लाखांहून अधिक रकमेचा मुद्देमाल हस्तगत
या संयुक्त कारवाईदरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून बेकायदेशीर गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे तब्बल १२,५०० लिटर गूळमिश्रित रसायन आणि ७०० लिटर तयार गावठी हातभट्टी दारू असा एकूण ५,०७,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
तब्बल १४ आरोपींवर कारवाई
पाटील तांडा (खुदावाडी) येथील खालील १४ आरोपींच्या ताब्यातून हा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे:
महिला आरोपी: विमल नादेव चव्हाण (५५), नागाबाई विलास चव्हाण (४१), सपना संतोष पवार (३०), अनुसया अमृत पवार (५१), उषाताई श्रीमंत पवार (४५).
पुरुष आरोपी: गुरुनाथ नुरा राठोड (६०), हिरा राम पवार (५५), सुरेश धनु पवार (४०), विकास शिवाजी राठोड (३५), हरीष टिकाराम जाधव (४५), सचिन सुभाष पवार (२४), लखन हिरा चव्हाण (३०), अमोल देविदास राठोड (५२), शंकर नुरा राठोड (४२).
या सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (फ), ६५ (ई), ८१ आणि ८३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस प्रशासनाचा इशारा:
“जिल्ह्यात अवैध धंदे चालवणाऱ्यांची गय केली जाणार नाही. अवैध दारू निर्मिती व विक्रीवर यापुढेही अशाच प्रकारची कडक कारवाई सुरूच राहील.”
– जनसंपर्क विभाग, धाराशिव पोलीस









