येडोळा पाटी ते येडोळा गावाला जोडणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण करावे व बोरी नदीवर पुलाचे बांधकाम करावे आदीसह विविध मागण्यांचे रिपाइं (आठवले) शाखेच्या वतीने जनता दरबारात दिले निवेदन
—————————————————-
नळदुर्ग ( एस.के.गायकवाड):
तुळजापूर तालुक्यातील दुर्गमय डोंगर माळरानात वसलेल्या येडोळा गाव ते नळदुर्ग-अक्कलकोट रोड वरील येडोळा पाटी जोडणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण करावे व बोरी नदीवर कायम स्वरूपी पुलाचे बांधकाम करून हा रस्ता दळण वळणासाठी सुरळीत करावा या प्रमुख मागणी सह अन्य विविध मागण्याचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) शाखा येडोळ्याच्या वतीने येथे आयोजित जनता दरबार व आढवा बैठकीत देण्यात आले आहे.
दि.४ऑगस्ट २०२६ रोजी प्रशासनाचा गावगाडा लोकांच्या दारी या उपक्रमा अंतर्गत ग्राम पंचायत येडोळा गावातील नागरिकांचा जनता दरबार व आढावा बैठक घेण्यात आली.या जनता दरबारास पंचायत समिती तुळजापूरचे सभापती व उपसभापती यांची अनुउपस्थितती दिसून आली तर जि.प. चे अर्थ व बांधकाम सभापती सिद्धेश्वर आण्णा कोरे, उपसभापती पती विवेकानंद मिलगीरे,प.स.सदस्य भिवाजी इंगोले, ग्रा.प.येडोळा सरपंचाचे प्रतिनिधी,शिवाजी जाधव,विस्ताराधिकारी जिवन पांचाळ,कृषी अधिकारी शुभम चव्हाण,कृषी सहाय्यक योगेश क्षिरसागर,कृषी समुह सहाय्यक गुलनाज शेख, डॉक्टर शेख आदींची मात्र प्रमुख उपस्थिती होती.
. जि. प. धाराशिवचे कृषी व बांधकाम सभापती सिध्देश्वर कोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जनता दरबार व आढावा बैठकीत येथिल जि.प. प्राथमिक शाळेत पाणी पुरवठा करणे, गायरान तांडा येथील अंगणवाडीत किचन शेडची व्यवस्था करणे, गावातील अंतर्गत रस्ते दुरूस्त करणे आदी सह गावच्या आडीआडणी संदर्भात चर्चा करण्यात आली.
. या प्रसंगी रिपाइं (आठवले) शाखा येडोळा च्या वातीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की नळदुर्ग – अक्कलकोट रोड वरिल येडोळा पाटी ते येडोळ गाव जोडणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण करावे,बोरी नदीवर कायम स्वरूपी पुलाचे बांधकाम करून येडोळा पाटी ते येडोळा गाव रस्ता दळण वळणासाठी सुरळीत करावा, जाणूजीराजे भोसले ऐतिहासिक समाधी पासून ते भिम नगर या मुख्या रस्त्याचे अंतर्गत सिमेंट रस्ता करावा, लोंढे नगर, भिम नगर येते अंतर्गत गटारीये बांधकाम करावे, भिमनगर येथे ओपन जिम ची सोय करावी आदी सह अन्य मागण्याने निवेदन अर्थ व बांधकाम सभापती सिध्देश्वर आण्णा कोरे याना देण्यात आले.यावेळी. रिपाइंचे (आठवले) शाखा अध्यक्ष देवानंद लोंढे,रामचंद्र लोंढे,भानुदास लोढे,अमर जेटीथोर,अमित लोंदे, शितल लोंढे,माजी सरपंच प्रभाकर पाटील, दिगंबर पाटील, बंटी पाटील, नवनाथ जाधव सह ग्रामस्थ उपस्थित होते.







