Best News Portal Development Company In India

तुळजापुरात ‘अक्षज सोलार अँड इलेक्ट्रिकल सोल्यूशन्स’चा दिमाखदार शुभारंभ! महंत मावजीनाथ बाबांच्या शुभहस्ते उद्घाटन; युवा उद्योजक आकाश बिराजदार यांचा नावीन्यपूर्ण उपक्रम

तुळजापुरात ‘अक्षज सोलार अँड इलेक्ट्रिकल सोल्यूशन्स’चा दिमाखदार शुभारंभ!
महंत मावजीनाथ बाबांच्या शुभहस्ते उद्घाटन; युवा उद्योजक आकाश बिराजदार यांचा नावीन्यपूर्ण उपक्रम.
तुळजापूर प्रतिनिधी:- तुळजापूरकरांना आता वाढत्या वीज बिलापासून कायमची मुक्ती मिळवून देण्यासाठी आणि सौर ऊर्जेचा प्रभावी वापर वाढवण्यासाठी ‘अक्षज सोलार अँड इलेक्ट्रिकल सोल्यूशन्स’ या शासन अधिकृत संस्थेचा भव्य उद्घाटन सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. युवा उद्योजक आकाश बिराजदार यांच्या या नवीन व्यवसायाचे शुभउद्घाटन पूज्य महंत मावजीनाथ बाबा यांच्या हस्तकमलांनी दिमाखात करण्यात आले.
जनता बँक खाली, नळदुर्ग रोड, तुळजापूर (जि. धाराशिव) येथे हे अत्याधुनिक दालन सुरू झाले असून, यामुळे परिसरातील नागरिकांना शासकीय अनुदानासह सोप्या व सुलभ पद्धतीत सोलार सिस्टीम बसवण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.
‘अक्षज सोलार’ची प्रमुख वैशिष्ट्ये आणि विशेष ऑफर्स:-
PM सूर्यघर मोफत वीज योजना: या योजनेंतर्गत ग्राहकांना ₹७८,०००/- पर्यंत सरकारी सबसिडी (अनुदान) उपलब्ध आहे. (ही योजना मार्च २०२७ पर्यंतच मर्यादित आहे.)
०% इन्व्हेस्टमेंट व सुलभ कर्ज: राष्ट्रीयकृत बँकांकडून फक्त ६% वार्षिक व्याजदराने सोलार कर्ज सुविधा. अवघ्या ३ ते ४ वर्षांत गुंतवणुकीचा पूर्ण परतावा!
दीर्घकालीन वॉरंटी व मोफत सर्व्हिस:
३० वर्षांपर्यंत पॅनल वॉरंटी.
८ वर्षांपर्यंत इन्व्हर्टर वॉरंटी.
५ वर्षे मोफत सर्व्हिस व नियमित देखभाल.
कमी कागदपत्रे व जलद प्रक्रिया: आधार कार्ड, पॅन कार्ड, लाईट बिल आणि बँक खात्याच्या आधारे जलद कर्ज मंजुरी व अनुभवी टीमकडून तत्पर इन्स्टॉलेशन.
नावाजलेले ब्रँड्स: प्रीमियर एनर्जीज (Premier Energies), वारी (WAAREE), अदानी रिन्युएबल्स (Adani Renewables), सनग्रो (SUNGROW) आणि ग्रोवॉट (Growatt) यांसारख्या विश्वासू ब्रँड्सचे ऑथोराईज्ड सोलार पॅनेल्स व इन्व्हर्टर्स उपलब्ध.
“वीजबिल ०/- रुपये करण्याची सुवर्णसंधी!”
उद्घाटन प्रसंगी बोलताना आकाश बिराजदार यांनी सांगितले की, “वाढत्या महावितरणच्या वीजबिलामुळे सामान्य नागरिक त्रस्त आहेत. ‘अक्षज सोलार’च्या माध्यमातून आम्ही तुळजापूर व परिसरातील नागरिकांना ‘झिरो लाईट बिल’चा पर्याय देत आहोत. महावितरणच्या वीजबिलातून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी सर्वांनी सोलार रूफटॉप सिस्टीमचा नक्की लाभ घ्यावा.”
उपस्थित मान्यवर:- अमोल भैया कुतवळ , विशाल भैया रोचकरी, रणजीत भैय्या इंगळे , आनंद मालक जगताप , राहुल खपले, गुलचंद भाऊ व्यवहारे, समाजसेवक पंकज भैय्या शहाणे, आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होतीया सोहळ्यास परिसरातील अनेक गणमान्य नागरिक, राजकीय, सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी युवा उद्योजक आकाश बिराजदार यांना पुढील वाटचालीसाठी उदंड शुभेच्छा दिल्या.
संपर्क व पत्ता:
दालन: अक्षज सोलार अँड इलेक्ट्रिकल सोल्यूशन्स
जनता बँक खाली, नळदुर्ग रोड, तुळजापूर, जि. धाराशिव – ४१३६०१
संपर्क क्रमांक: 8600848256 / 7720843014 / 9552856749

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india