Best News Portal Development Company In India

माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये मोफत ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू!

माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये मोफत ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू

​बी. फार्मसी अभ्यासक्रमासाठी सुविधा केंद्र म्हणून शासनाची मंजुरी; ३१ जुलै ते २० ऑगस्टदरम्यान अर्ज करण्याचे आवाहन
उमरगा /लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करिता बी. फार्मसी अभ्यासक्रमाच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी व सुविधा केंद्र म्हणून महाराष्ट्र शासनाकडून अधिकृत मंजुरी मिळाली आहे. अशी माहिती नगर शिक्षण विकास मंडळाचे अध्यक्ष बापूराव पाटील यांनी दिली आहे.
​या महाविद्यालयात बारावी विज्ञान शाखा उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी बी. फार्मसी प्रवेशाबाबत मोफत मार्गदर्शन केंद्र व ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रवेश प्रक्रियेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे आणि संपूर्ण प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थी व पालकांना सविस्तर माहिती दिली जाणार आहे. ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेबाबत पालक व विद्यार्थ्यांच्या मनात असणाऱ्या विविध शंका व अडचणी दूर करण्यासाठी महाविद्यालयातील अनुभवी व तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आले आहे.
या सुविधा केंद्रामध्ये विद्यार्थ्यांचे ऑनलाइन रजिस्ट्रेशन, मूळ कागदपत्रे पडताळणी आणि अर्ज निश्चिती केली जाणार आहे.
​ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याचा कालावधी ३१ जुलै ते २० ऑगस्ट २०२६
​अंतिम मेरिट लिस्ट जाहीर होण्याची तारीख १९ ऑगस्ट २०२६ असून
​बी. फार्मसी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थी आणि पालकांनी या मोफत सुविधा केंद्राचा जास्तीत-जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश्वर होगाडे यांनी केले आहे. प्रवेश प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी ​प्रा. योगेश पाटील (७२६१९२७५३५),
​प्रा. सुदीप ढगे ७०५७०१४२२२ यांच्याशी संपर्क साधावा.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india