Best News Portal Development Company In India

क्रांती दिनानिमित्त तुळजापुरात रक्तदानाचा महायज्ञ; २९६ दात्यांचे विक्रमी रक्तदान!

क्रांती दिनानिमित्त तुळजापुरात रक्तदानाचा महायज्ञ; २९६ दात्यांचे विक्रमी रक्तदान!
​तुळजापूर प्रतिनिधी :- ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून तुळजापूर शहर आणि परिसरातील विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिराला नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. या शिबिरात एकूण २९६ रक्तदात्यांनी रक्तदान करून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आणि क्रांतिकारकांना अनोखी सामाजिक आदरांजली वाहिली.
​प्रमुख उपस्थितांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन
​रोटरी क्लब तुळजापूर, युवास्पंदन सामाजिक संस्था, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, राजा शिवछत्रपती क्रिकेट क्लब, आर्ट ऑफ लिव्हिंग, शिवपार्वती मंगल कार्यालय, विठाई हॉस्पिटल आणि कुतवळ हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
​शिबिराचे उद्घाटन रोटरी क्लबचे अध्यक्ष अमर दाजी हंगरगेकर, सिनेकलावंत शंतनू गंगणे, नगरसेवक पंडितराव जगदाळे आणि अमर परमेश्वर यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.
​दंपती आणि महिलांचा लक्षणीय सहभाग
​या शिबिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे अनेक दांपत्यांनी (पती-पत्नी) एकत्र येऊन केलेले रक्तदान!
​एकत्रित रक्तदान करणारे दांपत्य: अमोल कुतवळ व गटनेत्या सौ. अंजली कुतवळ, कैलास पाटील व सौ. कल्पना पाटील, तुळजामाता आश्रमशाळेचे मुख्याध्यापक सतीश गरड व सौ. माधुरी गरड, नगरसेविका सौ. सरोजा अमृतराव व नरेश अमृतराव, आणि नितीन ढगे व सौ. जयश्री माळी-ढगे.
​महिला रक्तदाते- श्रीमती सविता लबडे, वैशाली पवार, ज्योती राऊत, नेहा कावरे, शिला कदम, सुहानी मगर आणि सुज्ञानी गिराम या महिलांनीही उत्स्फूर्तपणे पुढे येत रक्तदान केले.
​मान्यवरांची हजेरी अन् शुभेच्छा
​या रक्तदान महायज्ञाला शहरातील अनेक राजकीय, सामाजिक व पत्रकार क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी देऊन शुभेच्छा दिल्या व काहींनी स्वतः रक्तदान केले.
​उपस्थित मान्यवर- युवास्पंदनचे अध्यक्ष महेंद्र कावरे, रोटरीचे रोटरियन विष्णू मोंढे (PDG), सौ. मनीषा मोंढे, माजी नगराध्यक्ष जयश्री कंदले, गटनेते औदुंबर कदम, पुरवठा सभापती सागर कदम, विजयाआबा कंदले, नगरसेवक रत्नदीप भोसले, किशोर साठे, ज्योती आनंद सावंत, राहुलदादा भोसले, युवा नेते ऋषिकेश मगर, दादा खपले, चिन्मय मगर, अनिल अग्रवाल, दीपक (टोनू) अग्रवाल, प्रकाश मगर, रत्नदीप मगर आणि पत्रकार प्रशांत कावरे व अजित चंदनशिवे (लोकमत) आदींची प्रमुख उपस्थिती होती.
​१८ ते ६५ वयोगटातील नागरिकांचा उत्साह
​शिबिरामध्ये १८ वर्षांच्या तरुण-तरुणींपासून ते ६५ वर्षांपर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांनी अत्यंत उत्साहाने भाग घेतला.
​हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी अर्जुन गवळी, गुरू डोंगरे, अभिषेक औदुंबर कदम, अभिषेक अण्णा जाधव, विजय केवळकर, अजय रोडगे, डॉ. ढगे, गणेश साळुंके, सुनील हारहारे, प्रमोद चौधरी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india