Best News Portal Development Company In India

Nibe लिमिटेडचा सामाजिक पुढाकार; श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानास CSR मधून अत्याधुनिक स्वच्छता यंत्रसामग्री सुपूर्द!

Nibe लिमिटेडचा सामाजिक पुढाकार; श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानास CSR मधून अत्याधुनिक स्वच्छता यंत्रसामग्री सुपूर्द!
​तुळजापूर प्रतिनिधी :- महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनार्थ दररोज हजारो भाविक तुळजापुरात हजेरी लावतात. या पार्श्वभूमीवर मंदिर परिसर स्वच्छ, सुरक्षित आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून Nibe लिमिटेड (चाकण, पुणे) यांच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) निधीतून मंदिर संस्थानास अत्याधुनिक स्वच्छता यंत्रसामग्री भेट देण्यात आली आहे.
​सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून Nibe लिमिटेडने ही स्वच्छता साधने मंदिर प्रशासनाकडे सुपूर्द केली. या नवीन व अत्याधुनिक यंत्रसामग्रीमुळे मंदिर आणि परिसर स्वच्छता अधिक गतिमान, प्रभावी आणि कार्यक्षम पद्धतीने करणे शक्य होणार आहे. यामुळे दररोज येणाऱ्या भाविकांना अधिक चांगल्या आणि स्वच्छ वातावरणात दर्शन घेता येईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
​CSR अंतर्गत ही महत्त्वपूर्ण स्वच्छता साधने उपलब्ध करून दिल्याबद्दल श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानाच्या वतीने Nibe लिमिटेड कंपनीचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
​या हस्तांतरण प्रसंगी तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, जयसिंग पाटील, नागेश शितोळे, मंदिर संस्थानचे स्वच्छता निरीक्षक सूरज घुले, अक्षय साळुंखे, नितीन भोयर यांच्यासह मंदिर संस्थानचे इतर अधिकारी, कर्मचारी आणि BVG कंपनीचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india