Best News Portal Development Company In India

अरुण लोखंडे याचा संभाजी नगरात मान्यवराच्या हस्ते सन्मान!

अरुण लोखंडे याचा संभाजी नगरात मान्यवराच्या हस्ते सन्मान !
– – – – – – – – – – – – – – – – – –
नळदुर्ग (एस. के. गायकवाड ) तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील पत्रकार अरुण लोखंडे याचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई राज्य कार्यकारिणीच्या वत्तीने छत्रपती संभाजीनगर येथे सत्कार करण्यात आला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की जळकोट येथील पत्रकार अरुण लोखंडे यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई मराठवाडा विभागीय सचीव संपर्क प्रमुख पदी गुरूपोणिमेच्या दिवशी निवडीचे पत्र देवून निवड करण्यात आली या बद्दल
दि .९ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई मराठवाडा विभागीय आयोजित एकदिवीसय परिसांवाद आणि पुरस्कार सोहळ्याचे आयोजन हॉटेल गेट वे ताज मध्ये करण्यात आले होते त्याप्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय भोकरे संघाचे राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव ओरोटे प्रदेश अध्यक्ष निलेश सोमाणी जेष्ठ पत्रकार शाहीद शेख धनजंय लांबे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .
यावेळी महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा संभाजी नगरचे पालकमंत्री संजय शिरसाठ मनसेचे बाळा नांदगावकर मराठवाडा विभागाचे आयुक्त जी श्रीकांत साहेब स्वामी शांतीगीर महाराज मराठवाडा अध्यक्ष अनिल सांवत जिल्हा अध्यक्ष धत्रपती संभाजी नगर डॉ छुबराव ताके मुख्य सलागार मधुकर आण्णा वैदय मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी नवी मुंबई चे अध्यक्ष नवनाथ जाधव पत्रकार ईरफान काझी उमेश गायकवाड सिद्धार्थ बनसोडे सह महाराष्ट्र पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी मराठवाडा विभागाचे सर्व पत्रकार बांधव पदाधिकारी सह सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल सावंत यांनी केले तर आभार वैभव स्वामी यांनी मानले.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india