जुगार अड्ड्यावर धाड, मोटारसायकलसह १,४६,८७० रुपयांचे साहित्य जप्त!
* १३ आरोपीवीरुध्द गुन्हा दाखल
उमरगा /लोहारा आदिनाथ भालेराव.
तालुक्यातील सिमावर्ती भागातील तलमोड येथील आर.टी.ओ. कार्यालयाच्या बाजुस एन. एच ६५ हायवे रोडच्या दक्षीण बाजुस एका पत्राचे शेडचे पाठीमागील मोकळ्या जागेत. उमरगा पोलिसांनी धाड टाकून जुगारअड्ड्यावर कारवाई करुन मोटारसायकलसह १,४६,८७० रुपयांचे साहित्य जप्त करुन १३ आरोपीवीरुध्द गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तालुक्यातील सिमावर्ती भागातील तलमोड येथील आर.टी.ओ. कार्यालयाच्या बाजुस एन. एच ६५ हायवे रोडच्या दक्षीण बाजुस एका पत्राचे शेडचे पाठीमागील मोकळ्या जागेत तिर्रट नावाचा जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानुसार १० ऑगस्ट रोजी ५.२० वाजेच्या सुमारास उमरगा पोलिसांनी या अड्ड्यावर धाड टाकली. यावेळी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी जुगार खेळत व खेळवीत असताना मीळुन आले. त्यांचेकडून तीर्रट जुगाराचे साहित्य पत्ते, रोख रक्कम, मोबाईल, व मोटार सायकल त्याचे ताब्यात घेऊन जुगाराचे साहीत्य व रोख रक्कम असे एकुण १,४६,८७० रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधीकारी कार्यालयाचे पोहेकाॅ संतोश माधवराव बोयणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिम नारायण व्हनाळे (वय २६), गोविंद लक्ष्मण चंडाकपुरे वय (वय ५०), गहेष शिवाजी सास्तुरे (वय ३५) गकाजी तिपन्ना ढोणे (वय ३६), शिवराज नारायण व्हनाळे (वय ३४), धोंडीबा नरसप्पा चंडकापुरे (वय २८), राहुल गोविंद सास्तुरे (वय २५), दशरथ नारायण व्हनाळे (वय ३२), राम व्यंकट शिताळगिरे (वय ३७), कबीर गोपाळ ढोणे (वय ३८) सर्व रा. धाकटेवाडी ता. उमरगा, मोहन तुळशीराग व्हनाळे (वय ३७), सुनिल राम मेकाले (वय ३४) दोघेही रा. थोरलेवाडी ता.उमरगा व लखण विठठल खैरे (वय ३५) रा. जगदाळवाडी यांचे विरुध्द उमरगा पोलिसांत गुन्हा रजिस्टर नंबर ५१२/२०२६ प्रमाणे कलम १२ (अ) मं जु का नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक प्रल्हाद सुर्यवंशी यांचे आदेशानुसार पुढील तपास पोहेका कोंगुलवार करीत आहेत.






