Best News Portal Development Company In India

श्री तुळजाभवानी मंदिरात नागपंचमी आणि श्रावणी सोमवारचा दुहेरी योग; पारंपरिक खेळ, पूजा अन् भक्तीमय वातावरणात सण उत्साहात साजरा!

श्री तुळजाभवानी मंदिरात नागपंचमी आणि श्रावणी सोमवारचा दुहेरी योग; पारंपरिक खेळ, पूजा अन् भक्तीमय वातावरणात सण उत्साहात साजरा!
​तुळजापूर प्रतिनिधी:-
कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी माता मंदिरात आज नागपंचमीचा सण अत्यंत भक्तिभावाने आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे श्रावणातील पहिला सोमवार आणि नागपंचमी असा दुहेरी योग जुळून आल्याने आज तुळजाभवानी मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
​सकाळपासूनच मंदिरातील होमकुंडासमोर नागदेवतेच्या पूजनासाठी स्थानिक महिलांची मोठी उपस्थिती दिसून आली. जुन्या परंपरेनुसार होमासमोर भवानी-शंकराचा पितळी नागफणा मांडण्यात आला होता. तसेच या ठिकाणी चिखलाची नागदेवता साकारून तिची विधीवत पूजा करण्यात आली. महिलांनी नागदेवतेला दूध, लाह्या आणि विशेष नैवेद्य म्हणून उकडलेले कानवले अर्पण करून सुख-समृद्धीचे साकडे घातले.
​महिलांच्या खेळांनी फुलला मंदिर परिसर
नागपंचमीच्या औचित्य साधून सायंकाळी मंदिर परिसरात महिलांनी एकत्र येत फेर आणि भुलई यांसारखे पारंपरिक खेळ खेळले. या प्राचीन प्रथेचे पालन करण्यासाठी सायंकाळी ५ ते ६ या वेळेत मंदिरात पुरुषांना प्रवेश बंद ठेवण्यात आला होता. या काळात केवळ महिलांच्या पारंपरिक खेळांचा आणि उत्साहाचा गजर मंदिर परिसरात पाहायला मिळाला.
​कल्लोळ तीर्थात नागदेवतेचे विसर्जन
सायंकाळी चौघड्याच्या मंगलमय गजरात नागदेवतेची उत्तरपूजा करण्यात आली. त्यानंतर पूर्ण श्रद्धेने आणि पारंपरिक रीतीरिवाजांनुसार नागदेवतेचे कल्लोळ तीर्थामध्ये विसर्जन करण्यात आले.
​या संपूर्ण धार्मिक सोहळ्यावेळी तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, सौमय्याश्री पुजार, सहायक व्यवस्थापक (धार्मिक) अनुप ढमाले, नागेश शितोळे, सहायक सुरक्षा निरीक्षक ऋषभ रेहपांडे यांच्यासह श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india