Best News Portal Development Company In India

गुंजोटी येथे हाजी मुनव्वर बाबा व हाजी मक्काई दर्ग्यावर आमदार बसवराज पाटील यांची भेट!

*गुंजोटी येथे हाजी मुनव्वर बाबा व हाजी मक्काई दर्ग्यावर आमदार बसवराज पाटील यांची भेट*

६२४ व्या उरुसानिमित्त हिंदू-मुस्लीम बांधवांची मोठी उपस्थिती; सामाजिक एकतेचा संदेश.

उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
उमरगा तालुक्यातील गुंजोटी येथील सय्यद हजरत हाजी मुनव्वर बाबा व हाजी मक्काई दर्गा येथे सुरू असलेल्या ६२४ व्या उरुसानिमित्त धाराशिव-लातूर-बीड विधान परिषद मतदारसंघाचे आमदार बसवराजजी पाटील यांनी भेट देऊन दर्शन घेतले.
यावेळी उरूस कमिटीचे अध्यक्ष इरफान हमीद मुजावर यांच्यासह आमदार बसवराजजी पाटील यांचे जुने कार्यकर्ते मुनाफजी काझी तसेच मोहीधीन मुजावर, तकी मुजावर, अश्फाक मुजावर, जुबेर काझी, रहीम मुजावर, अरुण मुजावर, मज्जिद मुजावर, युसुफ मुजावर, बाबुमिया मुजावर, गौस मुजावर, शंकर पाटील, रवींद्र ढंगे , सिद्धाराम देशमुख, रमेश पाटील, इमरान मुजावर, शैलेश माळगे, रामकृष्ण पंत खरोशेकर, विठ्ठल बदोले, दिलीप भालेराव, पप्पू सागर, धनराज दिगंबरे, रशीद शेख, सोहेल मुजावर, सदानंद पाटील आणि प्रकाश आष्टी आदी उपस्थित होते.
यावेळी उरूस कमिटीच्या वतीने आमदार बसवराजजी पाटील साहेब तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मान्यवरांनी उरूसाच्या आयोजनाबद्दल कमिटीचे कौतुक केले.
उरुसानिमित्त दर्गा परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी गावातील कमिटी सदस्य तसेच हिंदू-मुस्लीम समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाविकांनी दर्ग्यावर दर्शन घेत उरुसात सहभागी होत उत्साह व्यक्त केला.
गुंजोटी येथील हा उरूस हिंदू-मुस्लीम एकतेचे प्रतीक मानला जात असून, दरवर्षी दोन्ही समाजातील भाविक मोठ्या श्रद्धेने या उत्सवात सहभागी होतात. यंदाही दोन्ही समाजातील नागरिकांनी एकत्रित सहभाग नोंदवत सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि एकतेचा संदेश दिला.
उरुसाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी उपविभागीय अधिकारी प्रशांत संपते तसेच उमरगा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे उरूस शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india