Best News Portal Development Company In India

स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात शाळेच्या माजी विद्यार्थ्याकडून गणवेशासाठी साडेआठ हजार रुपयाची देणगी.

स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात शाळेच्या माजी विद्यार्थ्याकडून गणवेशासाठी साडेआठ हजार रुपयाची देणगी.
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
उमरगा येथील आयएसओ मानांकित जिल्हा परिषद हायस्कूल उमरगा येथे मुख्याध्यापक पद्माकर मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा सुजाता मोरे डॉ. प्रसाद स्वामी डॉ. योगिता स्वामी अशोक पतगे उपस्थित होते शाळेतील 2005 च्या बॅचचा शाळेचा माजी विद्यार्थी उमरगा शहरातील प्रसिद्ध व्यापारी अश्विन केशव शेट्टी यांनी शाळेतील नववी व दहावीच्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना गणवेशासाठी 8500 ची देणगी दिली या शाळेला माजी विद्यार्थ्याकडून यापूर्वीही बारा लाख रुपयाचे सहकार्य मिळाले आहे शाळेचे कलरकाम शाळेच्या भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी, सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी शाळेचे माजी विद्यार्थी नेहमीच पुढे येतात आज शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी व विद्यार्थ्याचे शैक्षणिक अडथळे दूर करण्यासाठी अश्विन केशव शेट्टी याने आठ हजार पाचशे रुपयाचे सहकार्य करून सर्वांपुढे एक नवीन आदर्श निर्माण केलेला आहे. शाळेचे मुख्याध्यापक व शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांच्या हस्ते अश्विन केशव शेट्टी यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. यावेळी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांनी बहारदार कार्यक्रम सादर केले देशभक्तीपर गीत समाज प्रबोधन पर नाटिका मोबाईलच्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणामावर दहावीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नाटिकेला उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला. या कार्यक्रमासाठी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा सुजाता मोरे शिक्षण तज्ञ अशोक पतगे मीरा इंगळे डॉ.प्रसाद स्वामी डॉ. योगिता स्वामी डॉ.यतिराज बिराजदार व शाळेतील विविध समित्यांचे अध्यक्ष सदस्य व पालक मोठ्या प्रमाणात ध्वजारोहण सोहळ्यासाठी उपस्थित होते. स्वातंत्र्यदिनी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना व पालकांना यावेळी दहावी व बारावीच्या परीक्षेत कॉपीमुक्तीची शपथ देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख भाग्यश्री पंडित तर सर्व मान्यवरांचे आभार व सदानंद सुत्रावे यांनी मानले.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india