नाशिक येथे मतदार यादी पुनर्निरीक्षण संदर्भात आयोजित करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीला विधानपरिषदेचे आमदार बसवराज पाटिल यांची उपस्थिती.
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
दि.१९ रोजी मा.प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तसेच भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय महामंत्री व मतदार यादी पुनर्निरीक्षण मोहिमेचे राष्ट्रीय प्रमुख तरुणजी चुंग आणि महाराष्ट्र प्रदेश प्रमुख भगवानदासजी सबनानी यांच्या प्रमुख उपस्थितीत मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींसाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
एस.आय.आर. मोहिमेसाठी नियुक्त करण्यात आलेले राष्ट्रीय प्रमुख व महाराष्ट्र प्रमुख यांनी मोहिमेचा आढावा घेत पदाधिकारी व लोकप्रतिनिधींना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन व सूचना दिल्या. मतदार यादी अधिक सक्षम, अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने कार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
यावेळी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीषजी महाजन, विधान परिषद सभापती रामजी शिंदे, पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे, माजी मंत्री तथा आमदार संभाजी पाटील निलंगेकर, माजी मंत्री तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील, मंत्री अतुलजी सावे, मंत्री ना. मेघनाताई बोर्डीकर, राष्ट्रीय उपाध्यक्षा सौ. भारतीताई पवार, एस.आय.आर. प्रदेश संयोजक किरीटजी सोमय्या, माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार भागवतजी कराड, खासदार सुजयजी विखे पाटील, आमदार मंगेशजी चव्हाण, आमदार तथा महामंत्री सौ. माधवीताई नाईक, आमदार प्रशांतजी बंब, माजी मंत्री रामप्रसादजी बोर्डीकर, मराठवाडा संयोजक नितीनजी काळे, धाराशिव जिल्हाध्यक्ष दत्तात्रयजी कुलकर्णी, लातूर शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर, लातूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे, lभरत मारेकर, निलंगा मंडळाध्यक्ष कुमोद लोभे, औसा बी एल ए चे प्रमुख प्रा. भीमाशंकर राचट्टे, चाकूरचे मंडळाध्यक्ष सिद्धेश्वर पवार यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे विविध पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.








