Best News Portal Development Company In India

अनुसूचित जाती उपवर्गीकरण समर्थनार्थ धाराशिवमध्ये ‘महामोर्चा’; अलोट गर्दीने दणाणला रस्ता!

अनुसूचित जाती उपवर्गीकरण समर्थनार्थ धाराशिवमध्ये ‘महामोर्चा’; अलोट गर्दीने दणाणला रस्ता!
​तुळजापूर प्रतिनिधी:
अनुसूचित जाती आरक्षण लाभ वंचित जात समूहाच्या उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ आज धाराशिव शहरात भव्य ‘महामोर्चा’चे आयोजन करण्यात आले आहे. “लढा आपल्या मुला-बाळांच्या भविष्याच्या उद्धारासाठी” या आवाहनाला प्रतिसाद देत हजारो नागरिकांच्या अलोट गर्दीने या महामोर्चास सुरुवात झाली आहे.
​मोर्चाचे तपशील:
​वेळ व दिनांक: गुरुवार, दि. २० ऑगस्ट २०२६, सकाळी ११:०० वाजता
​मार्ग/स्थळ: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव
​निमंत्रक: श्री. युवराज(नाना) शिंदे (राज्य समन्वयक, सकल मातंग समाज, महाराष्ट्र राज्य)
​आपल्या मुला-बाळांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि उपवर्गीकरणाच्या मागणीला पाठबळ देण्यासाठी अनुसूचित जातीतील सर्व समाजबांधवांनी या महामोर्चामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला हक्क आणि न्याय मागण्यासाठी एल्गार पुकारला आहे.
या मोठ्या मोर्चासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india