प्राचार्य डॉ अतुल बोडखे यांची शिवाजी महाविद्यालयातील करिअर कट्टा विभागास सदिच्छा भेट
उमरगा/लोहारा प्रतिनिधीआदिनाथ भालेराव.
श्री. छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील करिअर कट्टा विभागास अमरावती येथील शिवाजी शिक्षण संस्थेचे जे. डी. पाटील सांगलूधकर महाविद्यालय, दर्यापूर येथील प्राचार्य डॉ. अतुल बोडके व त्यांचे सहकारी डॉ. राजेश बुरंगे ,डॉ.अनिल सोमवंशी ,डॉ.मिलिंद भिलपवार व कळंब येथील साई कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स येथील प्रभारी प्राचार्य डॉ. जगदीश गवळी यांनी सदिच्छा भेट देऊन करिअर कट्टा उपक्रमांतर्गत चालवल्या जाणाऱ्या उपक्रमाविषयी माहिती घेतली. यावेळी त्यांनी करिअर संसदेतील मुख्यमंत्री कु. पूजा हांडे,कु. प्रियंका इंगळे व गणेश मोरे यांच्याशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनीच त्यांना करियर कट्टाअंतर्गत चालवले जाणारे आय.ए.एस. आपल्या भेटीला, उद्योजक आपल्या भेटीला, स्पर्धा परीक्षा वर्ग ,पोलीस भरती प्रशिक्षण केंद्र व करिअर कट्टाअंतर्गत स्वतंत्र लायब्ररी याविषयी माहिती दिली. नंतर डॉ. देवरकर सर यांनी आर.ए. सी.लॅब अंतर्गत ए.सी., फ्रिज व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणाचे दुरुस्ती प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देऊन त्यांना कौशल्यआधारित रोजगाराची संधी कशी मिळवून दिली जाते याविषयीही माहिती दिली. प्राचार्य डॉ. अतुल बोडखे व त्यांच्या सहकाऱ्यांनी चालवल्या जाणाऱ्या उपक्रमांचे कौतुक करून उपस्थित विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी
उपप्राचार्य डॉ. विनोद देवरकर सर (विज्ञान शाखा), उपप्राचार्य डॉ. पद्माकर पिठले (कला शाखा), करियर कट्टा समन्वयक प्रा. डॉ. समाधान पसरकल्ले, प्रा. डॉ. अर्जुन कटके, प्रा. डॉ. चंद्रसेन करे व स्पर्धा परीक्षा सहसमन्वयक प्रा. डॉ.राम जाधव व विद्यार्थी उपस्थित होते.






