Best News Portal Development Company In India

प्रेषित हजरत महमद पैगंबर जयंती निमित्त नळदुर्ग येते जय्यत तयारी : विद्यूत रोषणाईनने नळदुर्ग शहर उजाळले!

प्रेषित हजरत महमद पैगंबर जयंती निमित्त नळदुर्ग येते जय्यत तयारी : विद्यूत रोषणाईनने नळदुर्ग शहर उजाळले!
———————————————
नळदुर्ग ( एस.के. गायकवाड):
ईद -ए -मिला दुनब्बी अर्थात प्रेषित हजरत महंमद पैगंबर जयंती निमित्त तुळजापूर तालूक्यातील नळदुर्ग शहरात जय्यत तयारी करण्यात आली असून नळदुर्ग शहर विद्युत रोषणाईने उजाळून निघाले आहे.जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे समजते.
. दि.२६ /०८ / २०२६ रोजी इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित हजरत महंमद पैगंबर यांची जयंती असून या जयंती निमित्ताने नळदुर्ग शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे समजते.
दिनांक २६ ऑगस्ट रोजी प्रेषित महंमद पैगंबर जयंती निमित्ताने शहरातील मुख्य रस्यावरून सकाळी ठिक १o.oo वा. दरम्यान मोटार सायकल रॅली काढण्यात येणार असून दुपारी ठिक २.oo वा. दरम्यान जयंती निमित्ताने शहरातील मुख्य रस्त्यावरून मिरवणूक काढली जाणार आहे.ही मिरवणूक असार मजिद किल्ला गेट मुलतान गल्ली कुरेशी गल्ली इनामदार गल्ली जामा मजिद चौक हात्ती मोहला भवानी चौक चावडी चौक क्रांती चौक भुई गल्ली मार्गे असार मजिद येथे या मिरवणुकीची सांगता होणार आहे.तर संध्याकाळी ठिक ९.०० .वाजत हाफीसाब सय्यद सगीर अहमद जहागीरदार नक्षबंदी यांच्या अधिपत्याखाली विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.तरी नळदुर्ग शहारातील सर्व नगरवाशियानी या सर्व कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवून सहकार्य करावे असे आवहान जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष शायन समीउल्ला काझी, उपाध्यक्ष युनूस इनामदार, युसूब शेख सह सर्व सन्मानिय सदस्य यानी केले आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india