Best News Portal Development Company In India

तुळजापूर-नळदुर्ग महामार्गावर थरार! चाकू-रॉडचा धाक दाखवून भाविकांना लुटले; ६४ हजार रुपयांचा ऐवज लांबवला!

तुळजापूर-नळदुर्ग महामार्गावर थरार! चाकू-रॉडचा धाक दाखवून भाविकांना लुटले; ६४ हजार रुपयांचा ऐवज लांबवला!
​तुळजापूर प्रतिनिधी;-तुळजापूर तालुक्यात चोरांची दहशत सुरूच भाविकांना नाहक त्रास.
शिर्डीहून देवदर्शन उरकून कलबुर्गीकडे परतणाऱ्या एका कुटुंबावर तुळजापूर-नळदुर्ग महामार्गावर दरोडा पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गंधोरा पाटीजवळ चार अनोळखी भामट्यांनी लोखंडी रॉड, पाईप आणि चाकूचा धाक दाखवत गाडीची काच फोडली आणि ६४ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम जबरदस्तीने चोरून नेली.
उमरगा येथील रहिवासी असलेल्या काजल संदीप पवार (वय ३०) या आपल्या कुटुंबासह शिर्डीहून दर्शन घेऊन दि. २० ऑगस्ट रोजी रात्री ११:१५ वाजेच्या सुमारास कलबुर्गीकडे जात होत्या. तुळजापूर-नळदुर्ग रस्त्यावरील गंधोरा पाटीजवळ दबा धरून बसलेल्या चार अज्ञात इसमांनी त्यांची गाडी अडवली. आरोपींनी गाडीच्या काचा फोडून घरातील सदस्यांना मारहाण केली. त्यानंतर शस्त्र दाखवून ६४ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम हिसकावून पोबारा केला.
​पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
याप्रकरणी पीडित महिला काजल पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून दि. २१ ऑगस्ट रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात चार अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०९(६) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस या अज्ञात दरोडेखोरांचा शोध घेत आहेत.
सदरील घटनेने भाविकांच्या मनात दहशत निर्माण झालेली आहे. पोलीस प्रशासनाने तातडीने यावरती उपाय योजना करण्याची गरज आहे अशी मागणी भाविकातून होत आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india