Best News Portal Development Company In India

चारित्र्याच्या संशयावरून तरटगावच्या तरुणाचा खून; माळुंब्रा येथील दोघांवर गुन्हा दाखल!

चारित्र्याच्या संशयावरून तरटगावच्या तरुणाचा खून; माळुंब्रा येथील दोघांवर गुन्हा दाखल!
​तुळजापूर प्रतिनिधी:-
पत्नीसोबत असलेल्या अनैतिक संबंधाच्या संशयातून एका २७ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना माळुंब्रा (ता. तुळजापूर) परिसरात घडली आहे. अरविंद बाळु मस्के (वय २७, रा. तरटगाव, ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी तामलवाडी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्ह्याची नोंद झाली आहे.
​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९:०० वाजेच्या सुमारास माळुंब्रा गावाकडे जाणाऱ्या हायवेजवळ ही घटना घडली. आरोपी विशाल वडणे आणि ओंकार वडणे (दोघे रा. माळुंब्रा, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) यांनी विशाल याच्या पत्नीसोबत असलेल्या अनैतिक संबंधाच्या कारणावरून अरविंद याच्यावर हल्ला करून त्यास जिवे ठार मारले.
​या प्रकरणी मृत अरविंदची आई रुक्मिणी बाळु मस्के (वय ४५, रा. तरटगाव) यांनी २२ ऑगस्ट २०२६ रोजी तामलवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या प्रथम खबर (FIR) वरून आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१), ११५(२), ३(५) सह अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा कलम ३(२)(V), ३(२)(VA) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तामलवाडी पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india