Best News Portal Development Company In India

उमरगा संभाव्य पाणीटंचाई संदर्भात उपविभागीय अधिकारी उमरगा श्री दत्तू शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न.

उमरगा संभाव्य पाणीटंचाई संदर्भात उपविभागीय अधिकारी उमरगा श्री दत्तू शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न.
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
उमरगा तालुक्यातील अपुऱ्या पर्जन्यस्थितीमुळे भविष्यात उद्भवू शकणारी पिण्याच्या पाण्याची संभाव्य टंचाई लक्षात घेता, तालुक्यातील लघु पाठबंधारे ,पाझर तलाव, यातून नजीकच्या गाव,खेडे, वस्ती यांना पाणीपुरवठा करण्यासाठी टँकर उपायोजना , तसेच तालुक्यात 14 गावांमध्ये 34 अधिग्रहण केलेल्या विहिर. बोअर यातून नागरिकांना पाणीपुरवठा होतोय का ?बाबत आढावा घेण्यात आला.
तसेच शासकीय लघु पाटबंधारे पाझर तलाव यातून अवैधरित्या पाणी उपसा होणार नाही.
यासाठी भरारी पथकांची आढावा बैठक घेऊन त्यांना सक्तीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सदरील पाणी साठवून तलाव व पाझर तलावातून अवैद्य रित्या पाणी उपसा होत असेल भारत पथकाने तपासणी करून पाणी उपसा करणाऱ्या विरुद्ध कडक कार्यवाही करून पाणी मोटर पंप, वायर जप्ती करण्यासंदर्भात
भरारी पथक नायब तहसीलदार. पोलीस अधिकारी.मंडळ अधिकारी संबंधित प्रकल्पाचे शाखा अभियंता ,महावितरण कंपनीचे अभियंता, ग्राम महसूल अधिकारी,ग्रामपंचायत अधिकारी ,ग्रामपंचायत कर्मचारी, लाईनमेन, पोलीस पाटील,कोतवाल यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
सदर बैठकीला तहसीलदार उमरगा गोविंद येरमे.नायब तहसीलदार भीमाशंकर बेरूळे,
ए.पी.आय.भराटे पोलीस स्टेशन उमरगा. पाटबंधारे विभागाचे अभियंता. मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी, पोलीस पाटील आधी उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india