कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांच्या वाढदिवसानिमित्त विजय गंगणे मित्र मंडळाकडून सत्कार!
शारदीय नवरात्र महोत्सव व आगामी वाटचालीसाठी तुळजाभवानी चरणी प्रार्थना करत दिल्या शुभेच्छा
तुळजापूर (प्रतिनिधी):
तुळजापूर नगरपरिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांचा वाढदिवस नुकताच अत्यंत उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. या स्नेहाच्या औचित्याने कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विजय गंगणे मित्र मंडळाच्या वतीने मुख्याधिकारी रणदिवे यांच्या दालनात जाऊन त्यांचा पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला व अभिष्टचिंतन करण्यात आले.
तुळजापूरचे कुलदैवत आई तुळजाभवानीचा आगामी दसरा व शारदीय नवरात्र महोत्सव अत्यंत निर्विघ्न, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावा, यासाठी यावेळी मुख्याधिकारी रणदिवे यांना विशेष शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच श्री तुळजाभवानी मातेच्या चरणी प्रार्थना करून त्यांच्या भावी प्रशासकीय वाटचालीसाठी व आरोग्यासाठी मंगलकामना व्यक्त करण्यात आल्या.
या सत्कार प्रसंगी नगरसेवक व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विजय गंगणे, नगरपरिषदेचे गटनेते औदुंबर कदम, ऋतुराज (ऋतू दादा) भोसले, रवी दादा भोसले, कृष्णा काळे, कुणाल जाधव यांच्यासह विजय गंगणे मित्र मंडळाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






