नळदुर्ग व परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्याबाबत प्रसिद्ध बातम्यांची चौकशी करून अवैध धंदे बंद करावे : नगर सेवक मारुती खारवे यांची वरिष्ठाधिकारी यांच्या कडे मागणी
—————————————————–
नळदुर्ग (एस.के.गायकवाड):
धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग ता. तुळजापूर व परिसरात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात चालू असून या संदर्भात विविध वृत्तपत्रातून व सोशल मीडिया च्या माध्यमातून अनेक वेळा बातम्या प्रकाशित होऊनही अध्याप अवैध धंद्याला आळा बसलेला नसून नेमकं या अवैध धंद्याला अभय कोणाचे आहे याबाबत संबंधित वृत्तपत्रातील बातम्यांची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी नळदुर्ग नगर परिषदेचे नगरसेवक तथा विरोधी पक्ष गट नेते मारुती सुदाम खारवे यांनी लेखी निवेदनाद्वारे अप्पर मुख्य सचिव (गृह), गृहविभाग महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई यांच्या कडे केली आहे.
. या़ बाबत मारुती खारवे यांनी दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की नळदुर्ग व परिसरात मोठ्या प्रमाणात कल्याण मुंबई मटका, चक्री मटका, हात भट्टी दारू विक्री वगरे अवैध्य धंदे चालू असून या संदर्भात वारंवार विविध वृत्तपत्रातून सोशल मीडिया वरून यूट्यूब चैनल वरून बातम्या प्रकाशित झालेल्या आहेत. तरी परंतु येथील स्थानिक पोलीस प्रशासन किंवा संबंधित प्रशासनाकडून म्हणावी तशी कसल्याही प्रकारची हालचाल होताना दिसत नाही.यासंदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी धाराशिव यांना लेखी निवेदन दिले असता त्यांनी उलट तुम्ही आम्हाला अवैध धंद्याचे लोकेशन पाठवा ठोस पुरावे पाठवा त्यांची नावे सांगा किंवा सीसीटीव्ही फुटेज असतील तर ते द्या मग आम्ही योग्य ती कारवाई करू असे बेजबाबदार पणाचे वक्तव्य केले आहे. यामुळे स्थानिक पोलीस प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर संशय निर्माण होत असून अनेक प्रश्नचिन्ह उभे राहत आहेत. त्यामुळे एखाद्या निवेदनाचा किंवा एखाद्या तक्रारी संदर्भाची चौकशी करण्याची जबाबदारी नेमकी कोणाची आहे फिर्यादीची की पोलीस प्रशासनाची असा प्रश्न पडला अजून स्थानिक पोलीस प्रशासनाबाबत प्रश्न चिन्ह निर्माण होता आहे.तेंव्हा आमच्याकडे असलेल्या वृत्तपत्रातील बातम्यांच्या कात्रणासहित आपल्याकडे निवेदन देण्यात येत आहे तरी या निवेदनाची जाणीवपूर्वक दखल घेऊन या प्रकरणी सखोल चौकशी करून योग्य ती कडक कारवाई करावी व नळदुर्ग आणि परिसरातील अवैद्य धंदे बंद करावे.असी मागणी करण्यात येत आहे.
. मा.अप्पर मुख्य सचिव(गृह) गृहविभाग महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई यांच्या कडून आता नेमकी काय कारवाई केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






