जळकोट येथे ईद-ए-मिलाद उत्साहात साजरी
पैगंबर जयंतीनिमित्त भव्य जुलूस; ठिकठिकाणी ज्यूस, मिठाई व फळांचे वाटप
जळकोट/प्रतिनिधी
तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथे ईद-ए-मिलाद अर्थात हजरत मोहम्मद पैगंबर जयंती मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्त मुस्लिम समाजाच्या वतीने गावातून भव्य जुलूस काढण्यात आला.
जुलूसमध्ये मक्का-मदिना यांच्या प्रतिकृतीने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. दिवसभर गावातील विविध ठिकाणी ज्यूस, मिठाई व फळांचे वाटप करण्यात आले. सायंकाळी गावातील प्रमुख मार्गावरून शानदार जुलूस काढण्यात आला. यावेळी धार्मिक घोषणांनी परिसर भक्तिमय वातावरणाने भारून गेला.
या जुलूसमध्ये वल्ली मुल्ला, सय्यद मुल्ला, खैरात इनामदार, इलाही घडीवाले, सय्यद तांबोळी, शकील मुलानी, शब्बीर शेख, शौकत शेख, सलीम शेख, बबलू इनामदार, बेग अफरोज, अल्ताफ दाभेदार, फारुख शेख, मेहबूब तांबोळी, सद्दाम शेख, इसाम सय्यद, मुस्तफा जमादार, समीर शेख, तोफीक जमादार, इब्राहिम अफजलपुरे, अमजद बागवान, मैनुद्दीन बागवान, रियाज जमादार, अझर पटेल यांच्यासह मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले.






