Best News Portal Development Company In India

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त धाराशिव शहर काँग्रेसचा स्तुत्य उपक्रम: अन्नदान आणि वृक्षलागवडीने जपली सामाजिक बांधिलकी!

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त धाराशिव शहर काँग्रेसचा स्तुत्य उपक्रम: अन्नदान आणि वृक्षलागवडीने जपली सामाजिक बांधिलकी!
​तुळजापूर प्रतिनिधी:-
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. हर्षवर्धनजी सपकाळ यांच्या ५८ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून धाराशिव शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने विविध सेवाभावी आणि समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. वाढदिवसाचा खर्च टाळून सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत हा दिवस अतिशय उत्साहात आणि सेवाभावी वृत्तीने साजरा करण्यात आला.
गेल्या १० वर्षांपासून निस्वार्थपणे गरजूंची सेवा करणाऱ्या सिव्हिल हॉस्पिटलसमोरील (मारवाड गल्ली) ‘अन्नपूर्ण छत्रालय’ येथे शहर काँग्रेसतर्फे अन्नदान करण्यात आले. सिव्हिल हॉस्पिटलमधील रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि परिसरातील गरजू नागरिकांना या वेळी अन्नाचे वाटप करण्यात आले. गरजूंच्या पाठीशी उभे राहून सामाजिक उत्तरदायित्व जपणे हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
​हातलादेवी डोंगरावर २०० वृक्षांची लागवड
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत शहरालगतच्या ऐतिहासिक हातलादेवी डोंगरावर २०० झाडांची लागवड करण्यात आली. केवळ वृक्षारोपण करून न थांबता, रोवलेल्या सर्व झाडांचे संगोपन आणि संवर्धन करण्याची जबाबदारीही काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्वीकारली. हरित क्षेत्र वाढवणे आणि भावी पिढीसाठी निसर्गाचे रक्षण करणे काळाची गरज असल्याचे या वेळी पटवून देण्यात आले.
या संपूर्ण उपक्रमात शहर काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि काँग्रेसप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्वांनी हर्षवर्धनजी सपकाळ यांना निरोगी आणि दीर्घायुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातही अशाच प्रकारे विविध सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा केला जात आहे.
​प्रमुख उपस्थिती-
या वेळी शहराध्यक्ष धनंजय राऊत, राजेंद्र शेरखाने, प्रशांत पाटील, गोरोबा झेंडे, पोपट शिंदे, हरिदास शिंदे, बाबा मोमीन, संजय गजधने, अंकुश पेठे, अभिमान पेठे, आरेफ मुलानी, सरफराज काझी, अविनाश रणखांब, प्रेमानंद सपकाळ, अशोक बनसोडे, सय्यद मन्सूर, अवेदाबाई चव्हाण, सुरेश जगताप, सुरेंद्र पाटील, राजेंद्र राऊत, विश्वजीत बनसोडे, आकाश चव्हाण यांच्यासह धाराशिव शहर काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india