Best News Portal Development Company In India

या जन्मावर …. या जगण्यावर शतदा प्रेम करावे …. ! इंद्रधनूत रंगली गाता रहे मेरा दिल मैफिल ….

या जन्मावर …. या जगण्यावर शतदा प्रेम करावे …. !
इंद्रधनूत रंगली गाता रहे मेरा दिल मैफिल ….
उमरगा /लोहारा प्रतिनिधीआदिनाथ भालेराव.
विठू माऊली … तू माऊली जगाची , तेरी उंगली पकड के चला … माँ मेरी माँ … माझे माहेर पंढरी … आहे भिवरी. सुख के सब साथी दुःख मे ना कोय …. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे…. या सह आदि गाण्यावर इंद्रधनु वृद्ध सेवा केंद्रातील जेष्ठ गाता रहे मेरा दिल संगीत मैफिलीत मंत्रमुग्ध झाले.
जगी ज्यास कोणी नाही … त्यास देव आहे या काव्य पंक्ती प्रमाणे येथील इंद्रधनू वृद्धसेवा केंद्रात आपल्या परतीच्या प्रवासातील मावळतीचे क्षणांचा आनंदोत्सव साजरा करित आहेत. जेष्ठांच्या जगण्याचा आनंद अधिक द्विगुणिक व्हावा . त्यांच्या तारुण्यातील आठवणींना उजाळा मिळाला. या साठी येथील ‘गाता रहे मेरा दिल , या कराओके संगीत रजनीचे निर्माता गायक आनंद मोरे , गायक संतोष बोडरे, बालाजी बडुरे , यांच्या वतीने येथील इंद्रधनू वृद्धसेवा केंद्रातील जेष्ठां करिता सदाबहार गीत गायनांच्या मैफिलीचे सादरीकरण केले. या संगीत मैफिलित जेष्ठांनी विविध गाण्यांचे सादरीकरण करून गीत गायनाच्या मैफीलीचा आनंद लुटला.
या वेळी गायक संतोष बोडरे यांनी ‘ तेरी उंगली पकडके चला … ओ माँ हे गीत सादर करून इंद्रधनूतील जेष्ठांना त्यांच्या जीवनातील मुलं – बाळे व नातवंडांच्या आठवणीनी जागृत केल्या. आनंद मोरे यांनी माऊली तू विठू माऊली , राधाही बावरी , सुख मे सब साथी दुःख मे ना कोय … या सह आदि गाण्यांचे सादरीकरण करून जेष्ठांच्या आनंदाश्रूंना वाट मोकळी करून दिली. बालाजी बडूरे यांनी ‘ या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे …. या गाण्याचे सादरीकरण करून परतीच्या प्रवासात सुद्धा जगण्याचा आनंदोत्सव साजरा करण्याचे स्पष्ट केले. गेल्या पंचेवीस वर्षा पासून इंद्रधनु मध्ये वास्तव्यास असलेले मुंबई येथील नव्वद वर्षीय मुरलीधर चव्हाण ‘ सांगा देवा मी काय करू …. हे गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
या रंगलेल्या गीत गायनांच्या कार्यक्रमात वृद्धसेवा केंद्रातील महिलांनीही अभंग ,गवळण ,भक्तीगीते, भावगीतांचे सादरीकरण करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या वेळी होमहवन , रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला. इंद्रधनूचे व्यवस्थापक प्रा. मारुती खमितकर , किरण बेळंबकर यांची उपस्थिती होती.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india