Best News Portal Development Company In India

नळदुर्ग बसस्थानकात फिरून खारे शेंगदाणे गोळ्या बिस्कीट विक्रेत्याचा प्रामाणिकपणा : प्रवाशी यानी विसरून गेलेला अँड्रॉइड मोबाईल वाहतूक नियंत्रणका कडे जमा केला!

नळदुर्ग बसस्थानकात फिरून खारे शेंगदाणे गोळ्या बिस्कीट विक्रेत्याचा प्रामाणिकपणा : प्रवाशी यानी विसरून गेलेला अँड्रॉइड मोबाईल वाहतूक नियंत्रणका कडे जमा केला!
———————————————–
नळदुर्ग (एस.के.गायकवाड):
दि.३१ऑगस्ट २०२६ रोजी रुकाळी ११.३० वा. दरम्यान तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग बस स्थानकात बाकड्यावर विसरून गेलेला एका प्रवासाचा अँड्रॉइड मोबाईल बस स्थानक परिसरात फिरून खारे शेंगदाणे गोळ्या बिस्कीट विकणाऱ्या विक्रेत्याने प्रामाणिकपणे वाहतूक नियंत्रकाकडे जमा करून संबंधित मोबाईल परत केला त्यांच्या या प्रामाणिक पणाबद्दल प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की प्रत्येक बस स्थानक, रेल्वे स्टेशन संबंधित स्पीकर वरून अवाहन केले जाते की प्रवाशांनी आपले किंमती दागिने मोबाईल जपून ठेवा, चोरापासून सावध रहा अशी सांगण्याची वेळ का आली तर गर्दीचा फायदा घेऊन वारंवार गळ्यातील दागिने अँड्रॉइड मोबाईल वगैरे चोरीचे प्रकार हल्ली वाढलेले आहेत त्यामुळे असे आव्हान करावे लागते. परंतु आजही काही प्रामाणिक माणसे आहेत त्यामुळे कुठेतरी माणुसकी जिवंत आहे असे वाटते याचाच प्रत्यय तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग बस स्थानकात आला.एका प्रवाशाने नळदुर्ग येथील बस स्थानकात बाकड्यावर अंदाजे १० ते १५००० हजार किंमतीचा अँड्रॉइड मोबाईल विसरून गेला होता. तो मोबाईल नळदुर्ग बस स्थानक परिसरात फिरून खारे शेंगदाणे गोळ्या बिस्कीट विकणारे खंडूशा बताले यांच्या निदर्शनास आला.त्यांनी तो मोबाईल घेऊन त्याच बाकड्यावर व समोरच्या बाकड्यावरील काही लोकांना विचारले की हा मोबाईल तुमचा तर नाही ना काही महाविद्यालय विद्यार्थी तिथे होते त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की हा मोबाईल आमचा नाही.तेंव्हा त्यांनी तो मोबाईल त्या दिवशी सेवेत कार्यरत असलेले नळदुर्ग बस स्थानकाचे वाहतूक नियंत्रक महेश डुकरे यांच्याकडे जमा केला.काही वेळाने लगेचच त्याच मोबाईलवर सलगरा (दिवटी) ता. तुळजापूर येथील श्रीमंत गायकवाड यांचा फोन आला फोनची रिंग वाजत होती वाहतूक नियंत्रकानी यांनी तो फोन उचलला तेंव्हा त्यांना सांगण्यात आले की सदर माझा मोबाईल मी बसस्थानकामध्ये विसरलो आहे.आणि मी तो मोबाईल घेण्यासाठी येतोय आपण कोठे अहात तेंव्हा त्यानी त्यांना व खंडूशा बताले याना बसस्थानकात बोलावून घेतले.वाहतूक नियंत्रक यांनी ओळख पटवून त्यांना तो मोबाईल परत दिला.त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर आनंददायी भाव दिसून आला.त्यांनी खंडूशा बताले व वहातुक महेश डूकरे यांचे आभार व्यक्त केले.सदर प्रकरणी प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त केले जात असून खंडूशा बताले यांच्या प्रामाणिक पणाबदल त्यांचे अनेकांनी अभिनंदन केले.
यावेळी पोलीस कॉन्स्टेबल कुंभार साहेब,रिपाइं (आठवले) चे जिल्हा सचिव एस. के. गायकवाड, जेष्ठ कार्यकर्ते उत्तम झेंडारे,युवा कार्यकर्ते विशाल डुकरे सह प्रवासी उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india