Best News Portal Development Company In India

सोन्याच्या बिस्किटाचे आमिष दाखवून ६० वर्षीय वृद्धेची ६५ हजारांची फसवणूक; तुळजापूर शहरातील धक्कादायक घटना!

सोन्याच्या बिस्किटाचे आमिष दाखवून ६० वर्षीय वृद्धेची ६५ हजारांची फसवणूक; तुळजापूर शहरातील धक्कादायक घटना!
​तुळजापूर प्रतिनिधी:-
बार्शी तालुक्यातील धामणगाव येथील ६० वर्षीय वृद्ध महिलेला सोन्याचे बिस्कीट देण्याचे आमिष दाखवून ६५ हजार रुपये किमतीचे कानातले दागिने लांबवल्याची धक्कादायक घटना तुळजापूर शहरात घडली आहे. याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात दोन भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, निलाबाई चंद्रकांत चौगुले (वय ६०, रा. धामणगाव, ता. बार्शी, जि. सोलापूर) या १ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११:१५ वाजेच्या सुमारास तुळजापूर येथील दीपक चौकाजवळ असलेल्या शिंदे हॉटेलच्या पाठीमागे जात होत्या. त्यावेळी दोन अनोळखी इसमांनी त्यांना अडवून, “आम्ही तुम्हाला सोन्याचे बिस्कीट देतो, तुम्ही तुमचे कानातले काढून द्या” असे सांगून आमिष दाखवले.
​त्यांच्या जाळ्यात अडकून निलाबाई यांनी आपल्या कानातील ११ ग्रॅम वजनाचे, ६५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने काढून त्या भामट्यांच्या स्वाधीन केले. या बदल्यात भामट्यांनी त्यांना सोन्यासारखे दिसणारे एक बनावट (खोटे) बिस्कीट देऊन त्यांची घोर फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर निलाबाई चौगुले यांनी २ सप्टेंबर २०२६ रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली.
​वृद्धेच्या तक्रारीवरून तुळजापूर पोलिसांनी दोन अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(४) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला असून, पोलीस या भामट्यांचा शोध घेत आहेत.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india

नळदुर्ग येथील ऐतिहासिक किल्ल्यातील बुरुजावरून दोन मुली व एक मुलगा यांच्या सह उडी मारून एका महिलेचा स्वहत्या करण्याचा प्रयत्न : महिला व मुलगा यांचा जागीच मृत्यू तर दोन मुली गंभीर जखमी!