!नळदुर्ग येथील ऐतिहासिक किल्ल्यातील बुरुजावरून दोन मुली व एक मुलगा यांच्या सह उडी मारून एका महिलेचा स्वहत्या करण्याचा प्रयत्न : महिला व मुलगा यांचा जागीच मृत्यू तर दोन मुली गंभीर जखमी
———————————`—————
नळदुर्ग ( एस.के.गायकवाड):
दि.o३ सप्टेबर २०२६ रोजी दुपारी दिड दोन वाजण्या दरम्यान नळदुर्ग तालुका तुळजापूर येथील ऐतिहासिक किल्ल्यात असलेल्या अतिउंच उपल्या बुरुजावरून एका महिलेने आपल्या दोन मुली व एका मुलासह खाली उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्यात ती स्वतः व तिचा दहा वर्षाचा मुलगा जागीच मृत्यू पावला तर दोन मुली गंभीर जखमी झाल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे.
. या बाबत मिळालेली माहिती अशी की नळदुर्ग येथिल ऐतिहासिक किल्ला पाहण्यासाठी म्हणून एक महिला आपल्या एक मुलगा व दोन मुली सह किल्ला पहाण्यासाठी आली होती. संपूर्ण किल्ला पहात पहात ते किल्ल्यातील टेहळणीसाठी बांधण्यात आलेला अतिउंच जवळपास शंभर दीडशे फुट उंचीचा असलेल्या उपल्या बुरुजावर ती आपल्या दोन मुली व एक मुलासह गेली. अत्यंत पुरवनियोजित ठरवून आल्याप्रमाणे तिने आपल्या पाच-सात अंदाजे वयाच्या दोन मुलींना व दहा वर्षाच्या एका मुलाला बुरुजावरून खाली ढकलून दिले व लगेच काही क्षणातच ती स्वतः बुरुजा वरून खाली उडी मारली या अत्यंत चित्त थरारक व दुर्दैवी घटनेमध्ये त्या महिलेचा व दहा वर्षाच्या एका मुलाचा जागीच मृत्यू झाला तर त्या दोन मुली ह्या गंभीर जखमी झाल्या आहेत जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून मृत्य महिलेचा व मुलाचा मृत्य देहाचा पंचनामा करून नळदुर्ग पोलिसांनी शासकीय दवाखान्याकडे पाठविल्याचे समजते.ती मृत्य महिला ही उमरगा तालुक्यातील व्हंताळ या गावातील एका प्रतिष्ठित घराण्यातील असल्याचे समजते.त्या मृत महिलेचे नाव अश्विनी तानाजी मोहिते असे असल्याचे समजते. उशिरापर्यंत मुलांची नावे कळाली नाहीत नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा पुढील तपास चालू असल्याचे समजते दुर्दैवी आणि चित्त थरारक हृदय दावक या घटने मुळे नळदुर्ग व परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
नळदुर्ग येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठा भुईकोट किल्ला असून या किल्ल्यामध्ये असलेले नर-मादी धबधब्याचे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी दरवर्षी पावसाळ्यात पर्यकांची गर्दी होते. परंतु यावर्षी पाऊसच नसल्यामुळे हे धबधबे काही चालू झाले नाहीत.तरी परंतु आजही हा किल्ला पाण्यासाठी पर्यटकाची वर्दळ दिसून येते या किल्ल्यातील दुसरे आकर्षण म्हणजे नळदुर्ग किल्ला आणि परिसरात टेहळणीसाठी किल्ल्याच्या मध्यभागी बांधण्यात आलेला शंभर ते दीडशे फुट उंचीचा उपल्या बुरुज आहे.
त्या बुरुजावर तत्कालीन दोन मोठ्या तोफा आहेत.त्या बुरुजावरून नळदुर्ग शहर आणि परिसराती सर्वत्र पाहणी केली जाते. त्यामुळे एक वेगळा आनंद या बुरुजावर मिळतो. म्हणून हा बुरुज पाहण्यासाठी ही पर्यटकांची गर्दी असते.
या घटनेमुळे बुरुजावर चहू बाजूने संरक्षणासाठी लोखंडी ग्रील बसवण्याची गरज आहे अशी चर्चा होत आहे.








