मौजे येडोळा गावाच्या प्रारूप मतदार यादीत वयाच्या नोंदीत मोठा घोळ अनेकांच्या वयाची नोंद १२६ वर्ष : बिएलओ ने झोपेत प्रारूप यादी तयार केली की काय चर्चला उधान
—————————————————-
नळदुर्ग (एस. के.गायकवाड):
आपल्या देशात कधी कशाचा मोठा घोटाळा होईल याचा नेम नाही कागदावर योजना राबवून कोट्यावधी रुपयाया घोटाळा केल्याचे उदाहरणे आपण पाहिलेली आहेत, ऐकलेली आहेत पण तुळजापूर तालुक्यातील जखमी तांडा येडोळा तांडा ग्रुप ग्रामपंचायत येडोळा येथे विशेष सखोल पुनरिक्षण 2026 अंतर्गत तयार करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीत मात्र वयाच्या नोंदीचा मोठा घोळ झाल्याचे दिसून आले आहे.अनेकांच्या वयाची नोंद १२६ वर्ष करून संबंधित बिएलओ ने एक नवा घोळ जनतेसमोर आणला असून सदर प्रारूप मतदार यादी ही बीएलओ ने झोपेत तयार केले की काय अशी उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.
या बाबत माहिती अशी की सध्या संबंध महाराष्ट्रात मतदार यादी चे विशेष सखोल पुनर्नरीक्षण सर्वे (SIR)२o२६ अंतर्गत प्रारूप मतदार यादी बनविण्याचे काम अंतिम टप्यात आले आहे. या साठी प्रत्येक गावोगावी शासनाने बीएलओची नियुक्ती केली असून त्यांच्या मार्फत त्या त्या गावात त्या त्या गावातील मतदार यादी चे पुनर्नरीक्षण सुर्वे केले जात आहे.या विशेष सखोल पुनरनिरीक्षण २o२६ अंतर्गत तयार करण्यात आलेली येडोळा गावची प्रारूप मतदार यादीचे प्रकाशन दि.३ं१ऑगस्ट २o२६ रोजी करण्यात आले त्या यादीचे वाचन करून ती यादी संबंधित ग्रामपंचायत कार्यालयालयात उपलब्य करण्यात आली.सोशल मीडियावर त्या यादीचा पीडीएफ टाकून लोकांना माहिती देण्यात आली. त्या मध्ये असे निदर्शनास आले की या गावात प्रारूप मतदार यादी नुसार पुरुष मतदार संख्या ही ४६१ असून महिला मतदारसंघांची संख्या ३७१असे एकूण ८३२ मतदार या गावात प्रकाशित झालेल्या प्रारूप यादीनुसार असल्याची नोंद करण्यान आली आहे. परंतु या पैकी जवळपास ५०% मतदारांच्या वयाची नोंद ही १२६ वर्षे अशी करण्यात आल्याचे दिसून येते आहे.
जगामध्ये भारत देश हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो तर या तरुणांच्या देशांमध्ये येडोळा हे गाव वृद्धांचे गाव म्हणण्याची वेळ आली आहे.संबंधित बीएलओ ने झोपेत ही यादी तयार केली की काय अशी उलट सुलट चर्चा या गावात होत आहे.अनेक तरुणांच्या वयाची नोंद १२६ झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अशा बेजबाबदारपणे पुनर सर्वेक्षण करणाऱ्या बीएलओ किंवा संबंधित वरिष्ठअधिकाऱ्याना याबाबत विचारणा केली असता आता नवीन मतदारांची नोंद करणे यादीतील चुकांची दुरुस्ती करणे या बाबत काम चालू असून ज्याची नोंद चुकीची झाली आहे किंवा नावात दुरुस्ती आहे किंवा वयाची नोंद चुकीची आहे अशा मतदाराने दुरुस्तीचा फॉर्म भरून ऑनलाईन करा असे सांगितले जात आहे.त्या नुसार दुरुस्ती होईल पण
अशा बेजबाबदार कर्मचाऱ्यांच करायचं काय असा प्रश्न ग्रामस्थातून विचारला जातअसून या मतदार यादीतील वयाच्या नोंदीचा झालेला मोठा घोळ हा आता सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे.








