नळदुर्ग येथे बनसोडे परिवाराकडून कन्या रत्नाचे हर्षउल्हाशी आनंदी वातावरणात थाटामाटात स्वागत!
—————————————————
नळदुर्ग (एस.के.गायकवाड):
तुळजापूर तालुक्यातील भीम नगर नळदुर्ग येथील बनसोडे परिवाराकडून कन्या रत्नाचे हर्ष उल्हासात आनंदी वातावरणात मोठ्या थाटामाटात स्वागत करण्यात आले असून हा एक आगळा वेगळा उपक्रम समाजाला प्रेरणा देणारा आहे.
याबाबत माहिती अशी की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) चे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब दुष्यंत बनसोडे राहणार भिमनगर नळदुर्ग ता.तुळजापूर यांचे द्वितीय सुपुत्र प्रशिक उर्फ भैय्या बाबासाहेब बनसोडे व सूनबाई निकिता उर्फ पायल यांना दि.३१ ऑगस्ट २०२६ रोजी कन्या रत्न झाले.
लातूर येथील दवाखान्यामध्ये डिलिव्हरी करण्यात आली. त्यावेळी त्यांना कन्यारत्न जन्मास आले असून आठ दिवस दवाखान्यातील उपचार घेऊन आई व बाळाला दि.८ सप्टेंबर २ o२६ रोजी नळदुर्ग येथे त्यांच्या राहत्या घरी आणण्यात आले.यावेळी बनसोडे परिवाराकडून रांगोळी घालून फुलांचे डेकोरेशन करून आजी आजोबा आई-वडील काका काकी या सर्व परिवाराने त्या कन्यारत्नाचे आनंदी आणि उत्साही वातावरणा मध्ये स्वागत करून कन्या रत्नाच्या जन्माचा आनंद उत्सव साजरा केला.
. मुळातच बनसोडे परिवाराला बुद्ध-फुले-शाहू- आंबेडकर चळवळीचा वारसा लाभलेला असून बाबासाहेब बनसोडे हे रिपब्लिकन चळवळीत निष्ठेने काम करतात तर दादासाहेब बनसोडे हे भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून बौद्ध धम्माचा प्रसार आणि प्रचार करण्याचे प्रामाणिकपणे आणि निष्ठेने काम करतात आंबेडकरी चळवळीमध्ये ते सक्रिय आहेत.नळदुर्ग आणि परिसरातील एकमेक प्रमाणित बौद्धाचार्य म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचे वडील स्मृतीशेष दुष्यंत बनसोडे हे तत्कालीन नळदुर्ग नगरीचे सलग पंधरा वर्षे नगरसेवक म्हणून जनतेची सेवा केलेली आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाच्या माध्यमातून त्यांनी स्वतंत्र हत्ती या पक्षाच्या चिन्हावर निवडणुका लढवून त्या जिंकले आहेत. त्यांच्यामुळे या घराण्याला सामाजिक चळवळीचा वारसा लाभलेला आहे.अशा या कुटुंबामध्ये प्रशिक उर्फ भैया आणि निकिता उर्फ पायल यांच्या पोटी कन्यारत्न जन्मास आले. ही एक आभिनंदनीय बाब आहे
. आपण बघतोय आजही मुलीच्या जन्माबाबत नाराजी व्यक्त केले जाते.मुलगी नको म्हणून अनेक वेळा स्त्री भ्रूणहत्या होताना दिसत आहेत.त्यामुळे मुलीच्या जन्माचे प्रमाण ही घटत चालले आहे. निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी मुला बरोबरचं मुलीची ही तितकीच गरज आहे.मुलीच्या जन्माचे प्रमाण कमी होताना दिसून येत आल्याचे लक्षात येताच शासनाने स्त्री भ्रूणहत्या विरोधी कायदा केला आहे. “बेटी बचाव बेटी पढाव” असा नारा देत मुलीचा सन्मान करण्याचे आवहान शासनाकडून केले जात आहे “मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी” असं म्हटलं जातं आणि अशा वातावरणा मध्ये बनसोडे परिवारांनी मात्र कन्यारत्न जन्माचे आनंदाने उत्साहाने स्वागत करून समाजाला एक वेगळी दिशा देण्याचं, प्रेरणादायी काम केलं आहे. त्याबद्दल त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.








