Best News Portal Development Company In India

धाराशिव आणि बीडसाठी वरदान ठरणाऱ्या ‘कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पा’च्या कामाला गती; १,५४,७३१ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार

धाराशिव आणि बीडसाठी वरदान ठरणाऱ्या ‘कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पा’च्या कामाला गती; १,५४,७३१ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार!
आमदार राणा जगजितसिंह पाटील. घाटणे,​           तुळजापूर प्रतिनिधी:-
उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी काम प्रगतीपथावर पूर्ण करण्याचा संकल्प. पाच टप्प्यात पाणी रामदारा तलावात जाणार. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाअंतर्गत मराठवाड्यातील अवषणप्रवण व आत्महत्याग्रस्त धाराशिव आणि बीड जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचन व पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी ‘कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवला जात आहे. या प्रकल्पामुळे एकूण १,५४,७३१ हेक्टर जमिनीला सिंचनाचा थेट फायदा होणार आहे. अशी माहीती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. सर्व पत्रकारांना ऑन द स्पॉट कामावरती आमंत्रित करून देण्यात आली.
​शासन निर्णयानुसार या प्रकल्पास ११,७२६.९१ कोटी रुपयांच्या द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यतेस मंजुरी मिळाली असून, सध्या Phase-1 मधील ७.०० अ.घ.फु. पाणी वापराच्या मर्यादेत कामे वेगाने सुरू आहेत.
​प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये व व्याप्ती:
​एकूण ओलित क्षेत्र: धाराशिव जिल्ह्यातील ८९,१८८ हेक्टर आणि बीड जिल्ह्यातील ६५,५४३ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे नियोजन.
​एकूण पाणी वापर: २३.६६ अ.घ.फु. पाण्याचे नियोजन असून, Phase-1 मध्ये ७.०० अ.घ.फु. आणि Phase-2 मध्ये १५.६६ अ.घ.फु. पाण्याचा वापर केला जाणार आहे.
​उपसा सिंचन योजनांचे स्वरूप:
​योजना क्र. १: ३.०८ अ.घ.फु. पाण्याचा वापर करून भूम, परंडा, वाशी, कळंब व धाराशिव तालुक्यातील १४,९३६ हेक्टर क्षेत्रासाठी १८ पाणी साठ्यांद्वारे पाणीपुरवठा केला जाईल.
​योजना क्र. २: २.२४ अ.घ.फु. पाण्याचा वापर करून तुळजापूर, उमरगा व लोहारा तालुक्यातील १०,८६२ हेक्टर क्षेत्रासाठी ४५ पाणी साठ्यांची साखळी तयार केली जाईल.
​योजना क्र. ३: बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील ८,५४७ हेक्टर क्षेत्रासाठी १.६८ अ.घ.फु. पाण्याचा वापर प्रस्तावित आहे.
​प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन:
प्रकल्पातील बहुतांश टप्प्यांचे काम प्रगतीपथावर असून, उपसा सिंचन योजना १ व २ मधील विविध टप्प्यांची कामे मार्च २०२७ आणि डिसेंबर २०२७ पर्यंत टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दुष्काळग्रस्त भागातील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटण्यास मदत होणार आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail