Best News Portal Development Company In India

मुरूममध्ये आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन उत्साहात साजरी; विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली.

मुरूममध्ये आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन उत्साहात साजरी; विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली.
उमरगा/लोहारा आदिनाथ भालेराव.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयातील पत्रकारिता प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या वतीने मंगळवारी (दि.८) रोजी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने काढण्यात आलेल्या साक्षरता रॅलीद्वारे नागरिकांमध्ये शिक्षणाचे महत्त्व रुजवण्यात आले.
​महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार यांच्या हस्ते रॅलीचे उद्घाटन झाले. या प्रसंगी प्राचार्य डॉ. महेश्वर होगाडे, डॉ. सतीश शेळके, डॉ. रवींद्र गायकवाड, प्रा. राजकुमार रोहीकर, डॉ. रवींद्र आळंगे, डॉ. नागोराव बोईनवाड, डॉ. आप्पासाहेब सूर्यवंशी, डॉ. राजेंद्र गणापुरे, डॉ. सुधीर पंचगल्ले यांची प्रमुख उपस्थिती होती.
​’ शिक्षणाचा घेऊ ध्यास, साक्षरतेने करू देशाचा विकास ‘, ‘ एकच नारा, एकच ध्यास-प्रत्येक हातात शिक्षणाचा प्रकाश ‘, ‘ साक्षर होऊ-सक्षम होऊ, देशाला प्रगत बनवू ‘ अशा प्रेरणादायी घोषणा देत विद्यार्थ्यांनी शहरात साक्षरतेचा संदेश दिला. या रॅलीमध्ये महाविद्यालयातील विविध शाखांचे विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि विस्तार केंद्राचे विद्यार्थी बहुसंख्येने सहभागी झाले होते.
​कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. विनायक रासुरे, डॉ. शीला स्वामी, डॉ. प्रतापसिंग राजपूत, प्रा. राजकुमार तेलंग, प्रा. लक्ष्मण पवार, प्रा. सचिन राजमाने, डॉ. नितीन हुलसुरे आणि प्रा. अजिंक्य राठोड आदींनी पुढाकार घेतला.
​रॅलीच्या सुरुवातीला विस्तार केंद्राचे समन्वयक प्रा. डॉ. महेश मोटे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुभाष हुलपल्ले तर राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. रमेश आडे यांनी आभार मानले.

मुरूम, ता. उमरगा येथील माधवराव पाटील महाविद्यालयाच्या विस्तार केंद्राच्या वतीने साक्षरता रॅली काढताना मान्यवर व विद्यार्थी-विद्यार्थिनी.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail